🌟सत्तारुढ पक्षांनी दहा टक्के आरक्षणाच्या घेतलेल्या निर्णयाने मराठा समाजाचे अतोनात नुकसान....!


 🌟सत्ताधार्‍यांच्या विरोधात जन आंदोलन उभारणार : मराठा प्रवाह समन्वय समितीचा निर्णय🌟

 परभणी (दि.१८ मार्च) :  सत्तारुढ पक्षांनी दहा टक्के आरक्षणाच्या घेतलेल्या निर्णयाने मराठा समाजाचे अतोनात असे नुकसान झाले असून त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूकीतून सत्तारुढ पक्षाच्या उमेदवारांविरोधात जनआंदोलन करीत सळो की पळो करुन सोडण्याचा निर्णय मराठा प्रवाह समन्वय समितीने घेतला आहे.

            मराठवाड्यातील मराठा समाजाच्या कुणबी नोंदी शोधून तसेच हैदराबाद स्वीकारून कुंडाचे प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गात समावेश करावा या मागणीकडे शासनाने दुर्लक्ष करत न टिकणारे दहा टक्के आरक्षण दिले आहे, याची कोणीही मागणी केली नव्हती. यामुळे हक्काच्या आरक्षणापासून शासनाने मराठा समाजाला दूर ठेवले त्यामुळे आता होत असलेल्या निवडणुकीत सत्ताधार्‍यांच्या विरोधात जन आंदोलन करून निवडणुकीत त्यांची त्यांना जागा दाखवण्यात येईल असा, निर्णय मराठा प्रवाह समन्वय समितीच्या वतीने करण्यात आला आहे. मराठा समाजाला कायम टिकणार्‍या आरक्षणाची वारंवार मागणी करूनही सत्ताधारी तसेच विरोधी पक्षानेही याकडे दुर्लक्ष केले तर उलट हक्काच्या आरक्षणापासून दूर ठेवत न टिकणारे आरक्षण अधून मधून देऊन मराठा समाजाची दिशाभूल करत फसवणूक सुद्धा केली. मराठा समाजाला हक्काचे व कायम टिकणारे आरक्षण हैदराबाद गॅझेट चा आधार घेऊन तसेच कुणबी नोंदीचा शोध घेऊन मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे यासाठी गेल्या 8 महिन्यापासून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन चालू आहे, या आंदोलनाकडे शासनाने दुर्लक्ष करत प्रत्येकवेळी दिलेले शब्द न पाळता विधानसभेतही या मागणीचा उल्लेख केला नाही किंवा या संदर्भात कोणताच निर्णय घेतला नाही तर  मराठा समाजात फूट पडावी म्हणून न टिकणारे आरक्षण दिले आहे. यामुळे मराठा समाजाचे खूप मोठे नुकसान झाले आहे, भविष्यात यांना धडा शिकवण्यासाठी लोकसभेच्या निवडणुकीत सत्ताधारी पक्षांच्या विरोधात जन आंदोलन तयार करून त्यांना त्यांची जागा दाखवण्यात येणार असल्याचा निर्णय मराठा प्रवाह समन्वय समितीच्या वतीने मराठवाड्यातील सर्व समन्वयकांनी घेतला आहे. याची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरीय समन्वयकाच्या माध्यमातून महानगरपालिका, नगरपालिका तसेच ग्रामपंचायत स्तरावर मराठा प्रवाह समन्वय समितीच्या शाखास्तरीय पदाधिकारी, सदस्य यांच्या वतीने करण्यात येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या