🌟परभणीतील पांडुरंग हॉस्पिटल मध्ये संशयास्पद अवस्थेत मृत्यू झालेल्या सुरज कुकडेच्या मृत्यूची चौकशी करा...!


🌟प्रांतिक तैलिक महासभेद्वारे प्रशासनास निवेदन🌟

परभणी (दि.12 मार्च) : येथील पांडुरंग हॉस्पिटलमधील सुरज कुकडे यांच्या संशयास्पद मृत्यूची तात्काळ चौकशी करावी व संबंधीत दोषिंविरुध्द कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेने जिल्हा प्रशासनास सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली.

           विष्णु नगरातील पांडुरंग हॉस्पिटलमध्ये तेली समाजाचा कुकडे हा युवक दोन वर्षांपासून कार्यरत होता. 29 फेबु्रवारी रोजी सकाळी पावणे नऊ च्या सुमारास तो रुग्णालयात पोहोचला. दुपारी 2.30 वाजता सहकार्‍यांबरोबर त्याने जेवण केले. 3.30 वाजता तो वडिलांशी फोनवर बोलला. रात्री 8.30 वाजेच्या सुमारास कोणीतरी कुकडे यांच्या घरी फोन करुन तुमच्या मुलाची तब्येत बिघडली, असा निरोप दिला. जेव्हा घरची मंडळी तत्परतेने पोहोचली तेव्हा संबंधित डॉक्टरांनी व्यवस्थित माहिती तर दिलीच नाही, उलट ताटकळत ठेवले, मुलापर्यंत जावू दिले नाही, तो कुठे आहे हे सांगितले नाही.नातेवाईकांनी वारंवार विचार केली तेव्हा समर्पक उत्तरे मिळाली नाहीत, शेवटी मुलाच्या मामाने विचारणा केली तेव्हा सुरज कुकडे याचा मृतदेह एका सिसीटीव्ही कॅमेरा नसलेल्या रुममध्ये मृतावस्थेत आढळून आला. डॉ.व्यंकटेश डुब्बेवार यांना विचारणा केली, तेव्हा त्यांनी डॉ. व्यंकटेश हराळे यांच्याकडे निर्देश करुन हराळे यांना विचारा असे म्हटले व तेथून पळ काढला. डॉ. हराळे हे ही काहीही न सांगता निघून गेले. शेवटी पोलिसांना पाचारण करुन पुढील कारवाई पोलिसांद्वारे झाली, असे या शिष्टमंडळाने नमूद करीत कुकडे यांच्या घरची परिस्थिती हलाकीची आहे, कुकडे हा एकमेव घरातील कर्ता पुरुष होता, असे नमूद करीत या प्रकरणात प्रशासनाने तात्काळ चौकशी करीत संबंधितांविरोधात ठोस कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

         या शिष्टमंडळात सतीश नगरसाळे, शिवशंकर सोनूने, निळकंठ राऊत, नारायण खंदारे, नागनाथ भाग्यवंत, पांडुरंग माने, नामदेव माने, दिलीप माने, चंद्रशेखर राऊत, उत्तम माने, विशाल खंदारे, दत्ता नळदकर, शंकर माने, सतीश भिसे, अनिकेत ताडकळसकर, गोविंद साखरे, बालाजी माने, संदीप देवडे, सुनील माने, शिवरत्न माने, विकास शिंदे, मारोती वाघमारे, अनंत नगरसाळे आदींचा समावेश होता.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या