🌟नांदेड जिल्ह्यातील बसमध्ये प्रवेश करतांना महिलांचे दागिने चोरणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेने केली जेरबंद....!


🌟स्थागुशाने 14 गुन्ह्यांचा लावला यशस्वी तपास : गुन्ह्मातील एकूण 6 लाख 46 हजार 935 रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त🌟

नांदेड (दि.०९ मार्च) - नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने देगलूर येथील एक महिलेसह दोन पुरुष आणि कर्नाटक राज्यातील भालकी येथील एक पुरुष अशा चार जणांना पकडून बसमध्ये प्रवेश करताना गर्दीचा फायदा घेऊन महिलांचे दागिने चोरल्याचे एकूण 14 गुन्हे उघडकीस आणले आहेत. 

पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. नांदेड जिल्ह्यात बस मध्ये प्रवास करताना गर्दीचा फायदा घेऊन बसमध्ये प्रवेश करणाय्या महिलांचे आणि बस मध्ये बसलेल्या महिलांची नजर चुकवून महिलांचे सोन्याचे दागिने चोरी करण्याचे बरेच प्रकार घडले होते. त्या संदर्भाने वजीराबाद पोलीस ठाण्यात 4, शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 2, कंधार पोलीस ठाण्यात 2 आणि बारड, शिवाजीनगर, रामतीर्थ, माव्ठाकोली, माहूर आणि लोहा येथे प्रत्येकी एक असे महिलांच्या दागिने चोरीचे 14 गुन्हा दाखल आहेत. 

या संदर्भने समांतर तपास करताना स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, पोलीस उप निरीक्षक दत्तात्रय काछे,पोलिस अंमलदार गंगाधर कदम,बालाजी तेलंग, विलास कदम, गणेश धुमाल्,, धम्मा जाधव, रणधीर राजवबंशी, गजानन बयनवाड,दीपक ओढणे, हेमलता भोयर, पंचफुला फुलारी, किरण बाबर, शेख कलीम आणि हनुमानसिंह ठाकुर यांनी दुर्गा मोहन हातवव्ठणे (28) रा.देगलूर हिवराज रामचंद्र उपाध्य (51) रा.देगलूर, बालाजी उर्फ बढ्छी गोविंद कोठगिरे (30) रा. देगलूर आणि प्रकाश तुकाराम वाघमारे (34) रा. कठणदाव्ठ ता. भालकी जि बिदर (कर्नाटक) हल्ली मुक्काम देगलूर अशा 4 ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी वेगवेगव्व्या पोलीस ठाप हद्दीत केलेले 14 दागिने चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून वेगवेगव्व्या गुन्ह्मातील एकूण 6 लाख 46 हजार 935 रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. माव्ठकोछी येथे घडलेल्या गुन्ह्याबाबत या चोरट्यांकड़ून काही जप्त करण्यात आलेले नाही पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाचे कौतुक केले आहे घडलेल्या गुन्ह्यांमधील ज्यांचे दागिने चोरीला गेले होते त्या महिलांनी नांदेड पोलिसांना मनःपूर्वक धन्यवाद दिले आहेत.या 4 चोरट्यांना पुढील तपासासाठी वजीराबाद पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या