🌟वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातल्या चिखली येथे तालुकास्तरीय पशुपक्षी प्रदर्शनी संपन्न....!


🌟रिसोड तालुक्यातील पशु-पक्षांचा सहभाग🌟


वाशिम:-जिल्हा परिषदेचा पशु संवर्धन विभाग आणि पंचायत समिती रिसोड यांच्या संयुक्त विद्यमाने चिखली (ता. रिसोड) येथे आयोजित केलेल्या भव्य पशुपक्षी मेळावा (दि.3) उत्साहान संपन्न झाला. तालुक्यातील उत्कृष्ट जणावरांनी व कुक्कुट वर्गीय पक्षांनी या प्रदर्शनीमध्ये सहभाग घेतला होता. प्रदर्शनीमध्ये उत्कृष्ट जणावरे व कुक्कुट वर्गीय पक्षांसह तालुक्यातील शेतकरी बांधव तथा पशुपालकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

पशुपक्षी प्रदर्शनीचे उद्घाटन खासदार भावनाताई गवळी यांच्या हस्ते गाय आणि वासराची पुजा करून करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन जि. प. उपाध्यक्ष चक्रधर गोटे यांची प्रमुख उपस्थिती हेती. काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्र प्रदेश महा सचिव दिलीपराव सरनाईक, जिल्हा परिषदेच्या कृषी व पशु संवर्धन विभागाचे सभापती वैभव सरनाईक यांची यावेळी विशेष उपस्थिती होती. रिसोड पं. स. सभापती हाडे, कारंजा पंचायत समितीचे सभापती प्रदिप देशमुख,  जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अरुण यादगिरे, जिल्हा पशु संवर्धन अधिकारी डॉ. जयश्री केंद्रे, रिसोड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी प्रमोद बदरखे, तहसिलदार प्रतिक्षा तेजनकर, चिखलीचे सरपंच अंभोरे, जि प सदस्य संतोष जाधव, पंचायत समिती सदस्य गणेश हरिमकर, गजाजन वाघ, गणेश साबळे, कांता नाना बोंडे, विठ्ठलराव सरनाईक, घनश्याम लाड, मंगेश  सरनाईक, संतोष लाड,  मनोज थोरात, शिवाजी सानप, अनिल मोरे आदिंची यावेळी उपस्थिती होती. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अरुण यादगिरे यांनी केले. जि प उपाध्यक्ष चक्रधर गोटे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. मेळाव्यात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांचे कौतुक करुन गोटे म्हणाले कि, शेतकऱ्यांनी शेतीसोबत पशुपालन करण्याचा जोड धंदा करावा. शेतकऱ्यांनी ऑरगॅनिक शेतीची  कास धरावी आणि देशी गायींचे संगोपन  करावे असे मत कृषी व पशुसंवर्धन सभापती वैभव सरनाईक यांनी व्यक्त केले. दिलीपराव सरनाईक यांनी अध्यक्षीय समारोप केला. आ. अमित झनक यांनीही या प्रदर्शनीसाठी आपला शुभेच्छा संदेश कळविला. 

प्रदर्शनीमध्ये घोडा, देशी गाय, संकरीत गाय, म्हैस, बैलजोडी, शेळी, मेंढी, श्वान आणि  कुक्कुट वर्गातील पक्षी यांचा सहभाग होता. कार्यक्रमात प्रदर्शनामध्ये उत्कृष्ठ ठरलेल्या जणावरांच्या मालकांना बक्षिसे व प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.  पशु प्रदर्शनी मध्ये एकूण 9 जनावरांच्या प्रकारामध्ये 85 हजाराचे प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ बक्षीसांचे मानचिन्ह व प्रमाणपत्रांसह वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन राम श्रृंगारे आणि उमेशश् देशमुख यांनी  केले. आभार प्रदर्शन पशुधन विकास अधिकारी डॉ. जयश्री केंद्रे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बाळासाहेब देशमुख, गणेशराव सरनाईक, बंडु धोत्रे, रामदास वानखेडे, वैभव देशमुख, विजय खडके, प्रदिप बुंदे, डॉ. संदिप घुगे, डॉ. शेषराव मोरे, डॉ. सतिश खरात, रमेश भगत, दिपक देशमुख गजानन कराळे आदिंनी परिश्रम घेतले.

 प्रदर्शनीत सहभागी  झालेल्या जणावरांचे व पक्षांचे परिक्षण करण्यासाठी डॉ. मेंढे, डॉ. पवार, डॉ. निलेश वाघमारे, डॉ. सुर्यवंशी, डॉ. शुभम ठाकरे, डॉ. योगेश साठे, डॉ.  विजयकुमार रोम, डॉ. गोटे आणि डॉ. शिवाजी सानप यांनी आपली जबाबदारी चोखपणे सांभाळली......

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या