🌟मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथील संस्कार गुरुदेव मंडळाचे लहान मुलांसाठी योगशिबीर ऊत्साहात संपन्न.....!


🌟मुलांना मोबाईलपासुन दुर ठेवण्यासाठी व खेळामध्ये छंद निर्माण करण्यासाठी आयोजन🌟

फुलचंद भगत

वाशिम :- लहान मुलांमध्ये वाढता मोबाईलचा वापर बघता अनेक दुष्परिनाम दिसुन येत असल्याने मुलांनी मोबाईलपासुन दुर राहुन खेळांमध्ये रुची निर्माण व्हावी व संस्कारक्षम शिक्षण मिळावे या दृष्टीने मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथील संस्कार गुरुदेव मंडळाकडुन दुर्गाताई दुगाने यांच्या प्रमुख नेतृत्वात योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

            मुलं ही देवाघरची फुलं या म्हणीप्रमाने हे निरागस बालके सध्या होत असलेल्या मोबाईलच्या अती वापरामुळे कोमेजत आहेत.या कोमेजत असलेल्या कळ्यांना फुलवण्यासाठी संस्कारक्षम शिक्षण देणे ही काळाची गरज असल्याचे लक्षात घेवून मंगरूळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथील सामाजीक कार्यकर्त्या दुर्गाताई दुगाने यांनी गुरुदेव संस्कार मंडळांच्या माध्यमातुन मुलांना सकारात्मक वृत्तीकडे वळवण्यासाठी योग शिबीर आणी विविध खेळाचे शिबिर आयोजीत करण्यात आले होते.या शिबिराच्या माध्यमातुन लहान बालकांमध्ये खिलाडु वृत्ती वाढावी,जिद्द,चिकाटीने ध्येय साध्य करण्याची कला अंगी यावी तसेच संस्कारक्षम शिक्षणाच्या माध्यमातुन सामाजिक बांधीलकी जोपासता यावी हा या शिबिरामागचा ऊद्देश होता.या योग शिबिरामध्ये लहान मुलांनी सहभाग नोंदवत विविध खेळ तथा योगाचे धडे गिरवले.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरूळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या