🌟मराठवाड्यातील नांदेड/हिंगोली/परभणी जिल्ह्यात सकाळी सहा वाजून नऊ मिनिटाला जाणवला भुकंपाचा सौम्य धक्का....!


🌟आखाडा बाळापूरच्या बाजूस भूकंपाचे केंद्र असल्याचे प्राथमिक माहिती🌟 

महाराष्ट्र राज्यातल्या मराठवाड्यातील नांदेड हिंगोली व परभणी जिल्ह्यात सकाळी ०६-०९ वाजेच्या सुमारास भुकंपाचे सौम्य धक्के जाणवले यामुळे अनेक घरे हादरल्या गेमली जमिनीतून काहीतरी गडगडत गेल्या सारखा आवाज देखील सर्वच ठिकाणी आला नांदेड परभणी हिंगोली जिल्ह्यात सर्वत्र हा भूकंपाचा धक्का आहे आखाडा बाळापूरच्या बाजूस भूकंपाचे केंद्र असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे त्यानंतर पुन्हा एकदा दहा मिनिटांनी सौम्य स्वरूपात भूकंपाचा धक्का जाणवला आहे.

दरम्यान नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात आज सकाळी ०६-०८ वाफेच्या सुमारास तालुक्यातील सर्व भागात भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला तर सकाळी ०६-१९ वाजेच्या सुमारास पुन्हा असाच धक्का पूर्वी पेक्षा थोडा कमी प्रमाणात जाणवला असून  नांदेड येथे अनेक भागात आज गुरुवारी सकाळी ०६-०८ ते ०६-०९ वाजेच्या दरम्यान जवळपास दहा सेकंद ४.२ रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के जाणवले.नांदेड- सांगवी विमानतळ परिसरात भूगर्भातून आवाज साखर झोपेतील नागरिक रस्त्यावर आल्याचे देखील निदर्शनास आले दरम्यान भूकंपाचा केंद्रबिंदू आखाडा बाळापूर पासून १५ किलोमीटरवर दाखवला जात आहे.

🌟हिंगोली परभणी नांदेड भूकंपाचे सौम्य धक्के :-

दरम्यान आज गुरुवार दि.२१ मार्च २०२४ रोजी पहाटे ०६-०८ ते ०६-०९ वाजेच्या सुमारास नांदेड हिंगोलीसह परभणी जिल्ह्यात देखील सर्वत्र सौम्य भुकंपाचे धक्के जाणवल्याने सर्वत्र भितीचे वातावरण पसरले असले तरी नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासकीय स्तरावर होत आहे....टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या