🌟परभणी येथील प्रभावती नगर येथील दत्त मंदिर परिसरात शिवीमुक्त 'होळी दहन' : युवकांचा कौतुकास्पद उपक्रम....!


🌟युवकांच्या शिवीमुक्त आदर्श होळी दहनाचे सर्वस्तरातून होत आहे कौतुक🌟

परभणी : परभणी शहरातील प्रभावती नगरातल्या दत्त मंदिर परिसरातील युवकांनी काल रविवार दि.२४ मार्च २०२४ रोजी होळी सनाच्या पार्श्वभूमीवर एकत्रित येऊन प्रथमतःच शिवीमुक्त 'होळी दहन' करीत संपूर्ण परभणी जिल्ह्यातील तरुण पिढीसमोर आदर्श निर्माण केला.


प्रभावती नगरातील दत्तमंदिर परिसरातल्या या शिवीमुक्त होळी दहनाच्या उत्सवात आसपासच्या माता भगिनी जेष्ठ मंडळींनी सहभाग नोंदवल्याचे पाहावयास मिळाले यावेळी युवकांनी भारतमाता की जय.....वंदे मातरम्....जय श्रीराम.....जय हनुमान....हरहर महादेव...छत्रपती शिवाजी महाराज की जय....आदी घोषणांनी संपूर्ण दत्त मंदिर परिसर दणाणून सोडला.

परिसरातील  युवकांनी शिवीमुक्त होळी सन साजरा करीत संपूर्ण परभणी जिल्ह्यातील तरुण पिढीसमोर एक आदर्श निर्माण केल्याने युवकांच्या या कौतुकास्पद उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या