🌟उद्योजक अनिरुद्ध देशमुख यांनी स्थापन केलेल्या 'असेप्टिक थर्मोप्रोसिस, पुणे' या कंपनीस भारतीय 'उद्योग रत्न' पुरस्कार....!


🌟अनिरुद्ध देशमुख यांना 'भारतीय उद्योगरत्न' हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार दि.03 मार्च रोजी मान्यवरांच्या हस्ते प्रदान🌟

पुणे : येथील तरुण उद्योजक अनिरुद्ध देशमुख यांना सेवाभावी संस्थांच्या वतीने यावर्षीचा 'महाराष्ट्र उद्योगभूषण पुरस्कार' आणि त्यांनी स्थापन केलेल्या 'असेप्टिक थर्मोप्रोसिस (पुणे)' कंपनीस 'बेस्ट कंपनी ऑफ द ईअर'चा 'भारतीय उद्योगरत्न' या राष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराने रविवारी (दि.3 मार्च) मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

   ग्लोबल स्कॉलर्स फाऊंडेशनद्वारा नवोदित उद्योजक,लघुउद्योजक, विविध सूक्ष्म,लघु व मध्यम उद्योग क्षेत्रातील कंपन्यांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने दरवर्षी सन्मानित करण्यात येते.वर्षभरातील कार्यव्यवहार, गुणवत्तापूर्ण उत्पादन व देश विदेशात विविध ठिकाणी उभारलेले प्रकल्प आणि अल्पावधीत उद्योगक्षेत्रात केलेल्या कार्याचा आढावा घेऊन  उद्योजक अनिरुद्ध देशमुख यांनी स्थापन केलेल्या 'असेप्टिक थर्मोप्रोसिस, पुणे' या कंपनीस 'बेस्ट कंपनी ऑफ द ईअर' या वर्गवारीत 'भारतीय उद्योगरत्न-2024' हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार जाहीर झाला होता.

 पुणे येथील यशवंतराव चव्हाण अकॅडमी ऑफ डेव्हलपमेंट ऍडमिनिस्ट्रेशनच्या(यशदा) सभागृहात रविवारी (दि 3) सकाळी पार पडलेल्या समारंभात  पद्मश्री डॉ. मिलिंद कांबळे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. हा सन्मान व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशमुख,संचालक डॉ. हरिभाऊ पाटील व सहकारी यांना प्रदान करण्यात आला.यावेळी कर्नाटक,आंध्रप्रदेश, पश्चिम बंगाल,केरळ, छत्तीसगड,गुजरात इत्यादी देशभरातील अन्य निवडक उद्योजकांनाही  गौरविण्यात आले.

  रविवारी (दि 3) हॉटेल लेमन ट्री प्रीमियर येथे झालेल्या दुसऱ्या एका समारंभात  फूड प्रोसेसिंग टर्नकी प्रोजेक्ट उभारणी क्षेत्रात उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन 'स्विफ्ट अँड लिफ्ट मीडिया' या सेवाभावी संस्थेच्या वतीने अनिरुध्द देशमुख यांना 'महाराष्ट्र उद्योगभूषण पुरस्कार-2024' (महाराष्ट्र बिझनेस अचिव्हर्स अवॉर्ड) देऊन गौरविण्यात आले.हा सन्मान त्यांना प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

  पुरस्कारप्राप्त अनिरुद्ध देशमुख यांचे विविध स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.

*******************************************

🌟यशाची ही 'हॅट्ट्रिक' पुढील कार्यासाठी प्रेरणादायी होय - अनिरुद्ध देशमुख 

'भारतीय उद्योगरत्न' व 'महाराष्ट्र उद्योगभूषण' या दोन्ही पुरस्कारापाठोपाठ भारत सरकारच्या सूक्ष्म,लघू व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या वतीने  'असेप्टिक थर्मोप्रोसिस,पुणे' कंपनीच्या गुणवत्तापूर्ण उत्पादक कार्याची नोंद घेऊन  दि. 1 मार्च 2024 रोजी कंपनीस 'झेड ब्रॉंझ' मानांकन प्रमाणपत्र दिले आहे.यशाची ही 'हॅट्ट्रिक' पुढील कार्यासाठी प्रेरणादायी होय,अशी प्रतिक्रिया श्री. अनिरुद्ध देशमुख यांनी व्यक्त केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या