🌟परभणी जिल्ह्यांतील सिमांवर लोकसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर वाहनधारकांची कसून तपासणी....!


🌟जिल्हा पोलीस दलाची निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर विशेष तपासणी मोहीम🌟 

परभणी (दि.३१ मार्च) : परभणी जिल्हा पोलिस दलाकडून लोकसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील सर्व सिमांवर तंबू ठोकून निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यात येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांसह वाहनधारकांची देखील कसून तपासणी मोहीम सुरु करण्यात आली आहे.

         या लोकसभा निवडणूकीत आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावनी व्हावी, कोणत्याही पक्षाने,उमेदवाराने निवडणूकीच्या दरम्यान कोणतेही गैरप्रकार करु नयेत, विशेषतः रोख रक्कमेसह इतर वस्तूंची ने-आण करु नये यासाठी जिल्हा पोलिस यंत्रणेने सर्वतोपरी खबरदारीचा उपाय म्हणून सीमेवरील भागात पोलिस चौक्या उभारल्या आहेत.

          जिंतूर तालुक्यातील येलदरी जलाशयाच्या वरील भागात पोलिस यंत्रणेने तंबू ठाकून विदर्भातून मराठवाड्यात येणार्‍या व मराठवाड्यातून विदर्भात जाणार्‍या वाहनांची कसून तपासणी सुरु केली आहे. येलदरी धरणाच्या पूर्णा नदीवर बांधण्यात आलेल्या पूलावरुन विदर्भात व मराठवाड्यात वाहनांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या