🌟परभणीत मूत्राशयातील कर्करोगाच्या दुर्मिळ गाठीवर यशस्वी शस्त्रक्रिया.....!


■ डॉ.राहुल पाटील हॉस्पिटल आणि रिसर्च इन्स्टिटयूट व परभणी वैद्यकिय महाविद्यालय मधील डॉक्टरांची किमया ■

डॉ.राहुल पाटील हॉस्पिटल आणि रिसर्च इन्स्टिटयूट व परभणी वैद्यकिय महाविद्यालय येथील सुप्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉ.अमीर तडवी व यूरोलॉजिस्ट डॉ.कौशल कोंडवार आणि  यांनी ८० वर्षीय रुग्णाची मूत्राशयातील पिशवीत कर्करोगाची गाठ होणे हे अतिशय दुर्मीळच आहे. अशा रुग्णांना आपले प्राण गमवावे लागतात . मात्र अशा दुर्मिळ गाठीने त्रस्त आशा रुग्णाची गाठीवर शस्त्रक्रिया यशस्वी संपन्न केली. 

सुप्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉ.अमीर  तडवी ओपीडीमध्ये रूग्णांची प्रथम तपासणी करत असताना हा ८०  वर्षीय वयवृद्ध रुग्णास सोनोग्राफी,रक्त, लघवी आणि इतर तपासण्यांची देखिल अल्पदरात सुविधा उपलब्ध आहे असे  सांगून सर्व चाचण्या करून  त्याच्या मूत्राशयाच्या पिशवीत गाठ असल्याचे निदर्शनास आल्याने निष्पन्न झाले. अतिशय कमी खर्चात त्या ८०  वर्षीय वय वृद्ध दुर्बीणद्वारे जटिल व यशस्वी शस्त्रक्रिया करून कर्करोगापासून रोगमुक्त करून त्या वे जीवनदान देण्याची किमया मा.डॉ. राहुल पाटील हॉस्पिटल आणि रिसर्च इन्स्टिटयूट व परभणी वैद्यकिय महाविद्यालय मधील डॉक्टराणी केली त्या रुग्णांनी सर्व डॉक्टर्स व हॉस्पिटलमधील सर्व कर्मचार्यांकडून मिळालेल्या सेवेचे खूप खूप आभार मानले त्याच बरोबर मा.आ.डॉ. राहुल पाटील यांनी परभणी सर्व गोर गरीब जनतेने डॉ. राहुल पाटील हॉस्पिटल आणि रिसर्च इन्स्टिटयूट व परभणी वैद्यकिय महाविद्यालयमध्ये उपचारासाठी यावे असे आव्हान केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या