🌟मंगरुळपीर येथील महिलांनी केला संदेशखलीतील महिलांवरील अत्याचाराचा जाहीर निषेध....!


🌟राष्टसेविका समितीचे लेखी निवेदन प्रशासनाला सादर🌟

फुलचंद भगत

वाशिम :- पश्चिम बंगालमधील संदेशखली येथे होत असलेल्या महिलांवरील अत्याचाराचा मंगरुळपीर येथील राष्टसेविका समिती,विश्व मांगल्य सभा,जिजाऊ ब्रिगेड,भाजपा महिला आघाडी,श्री.संताजी महिला समितीने  मंगरुळपीर येथील ऊपविभागिय अधिकारी आणी तहसिलदार यांना निवेदन देऊन निषेध नोंदवला.

             संदेशखलीमध्ये मुले व महिलांसोबत अनन्वित व्यवहार, शारीरिक शोषण, मारहाण आदी अनेक घटना घडत आहेत. याकडे समाज व राष्ट्रपतींचे लक्ष वेधण्यासाठी हे निवेदन देण्यात आल्याचे मंगरुळपीर येथील राष्टसेविका समिती,विश्व मांगल्य सभा,भाजपा महिला आघाडी,जिजाऊ ब्रिगेड तसेच श्री.संताजी महिला समितीच्या शेकडो महिलांनी प्रशासनाला आपल्या मागण्याचे लेखी निवेदन सादर केले.संदेशखलीमध्ये महिला, मुलींवर अत्याचार हा बंगाल व तेथील पोलिसांचा नाकर्तेपणा आहे. तेथील महिला व मुलींची परिस्थिती चिंताजनक आहे. आर्थिक, राजकीय व धार्मिक मुद्यांमध्ये महिलांचा साधन म्हणून वापर अपमानजनक, दुर्दैवी व निंदाजनक असल्याने आम्ही या अत्याचाराचा तीव्र निषेध करीत आहोत, असे या निवेदनात म्हटले आहे.महिला समितीच्या शिष्टमंडळाने पुढील आंदोलनाचा उद्देश सांगून संदेशखली येथील महिला, मुलांवर अत्याचार करणार्‍या आरोपींना अटक करून कडक शिक्षा द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली असल्याचे सांगितले.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर जिल्हा वाशिम 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या