🌟महाराष्ट्र शासनाने प्रस्तावित केलेला शक्तीपीठ महामार्ग रद्द कराव.......!


🌟परभणी जिल्ह्यातून जाणारा हा महामार्ग अनेक गावे उधवस्त करत जाणार : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली मागणी🌟


परभणी (दि.१२ मार्च) : महाराष्ट्र शासनाने प्रस्तावित केलेला शक्ती पीठ महामार्ग परभणी जिल्ह्यातील अनेक गावं उध्वस्त करीत जाणार असल्यामुळे हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या एका शिष्टमंडळाने आज मंगळवार दि.१२ मार्च रोजी जिल्हा प्रशासनास सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली.

               परभणी जिल्ह्यातून जाणारा हा महामार्ग अनेक गावे उधवस्त करत जाणार आहे, असे नमूद करीत या निवेदनात या संघटनेने ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अल्प भूधारक शेतकरी आहेत. या महामार्गात अल्पभूधारक शेतकरी भूमिहीन होणार आहे. हा महामार्ग जर अल्पभूधारक शेतकर्‍याच्या मधोमध गेल्यास दोन्ही बाजूला उरलेली थोडी थोडी जमीन कसायाची कशी...? असा प्रश्‍न उभा राहणार आहे, असे म्हटले.

           बरेच पाण्याचे स्त्रोत अडवले जाणार. महामार्ग जात असलेला  जिल्ह्यातील बराच भाग बागायती असल्यामुळे सुपीक आणि चांगल्या उत्पादन क्षमता असलेल्या जमिनी यात जात आहेत, असेही या शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे नमूद करतेवेळी भविष्यात वाढत्या लोकसंख्येची अन्नधान्याची गरज भागवणे अवघड होईल. दुसरीकडे जिल्ह्यात कोणतेच ऊद्योग धंदे नाहीत, शेती शिवाय या जिल्ह्यात दुसरा उद्योग नाही. अश्या परिस्थितीत या महामार्गामुळे अनेक शेतकरी देशोधडीला लागणार आहेत, असा इशारा दिला.

           हा महामार्ग रद्द नाही केला तर स्वाभिमानी शेतकरी संघटना परभणी जिल्ह्यातील शेतकर्‍याच्या वतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असेही म्हटले. या निवेदनावर किशोर ढगे,  रामप्रसाद गमे, मुंजाभाऊ  लोडे, गजानन तुरे,  माऊली शिंदे,  प्रसाद गरुड,  रमेश नामदेव गरुड, गजानन पांडुरंग गरुड, रामभाऊ साहेबराव दामोदर, शिवराज शेटे, अंकुश संभाजी गरुड, पांडुरंग रुस्तुमराव गरुड, नारायण शंकर गरुड, रामराव अवचार, नामदेव रुस्तुम आवचार, सुंदर तुकाराम वाघ, श्रीरंग सोपान वाघ, शिवाजी बनसोडे, कुंताबाई बनसोडे, विश्‍वनाथ नारायण बनसोडे, विजय नागोराव बेले, सावित्र विजय बेले, नागोराव अप्पाराव बेले, भागीरथी नागोराव बेले, गंगाधर शेट्टे, गजानन दामोधर आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या