🌟हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातल्या बाभुळगाव येथील पाच घरांना लागली भिषण आग : आगीत लाखोंचे नुकसान....!


🌟शॉट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज : घरातील अन्नधान्यासह गृह उपयोगी साहित्य जळून खाक🌟


✍🏻शिवशंकर निरगुडे : हिंगोली

हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील बाभुळगाव येथील शॉर्टसर्किटमुळे पाच घरांना आग लागली आहे या आगीमध्ये पाच कुटुंबाचे नुकसान झाले आहे ही घटना काल रात्री बारा वाजता यामध्ये पाच शेतकऱ्यांची घरे जळाली आहेत वैजनाथ शिंदे या शेतकऱ्याचे सात लाख रुपये नुकसान झाले आहे दतराव शिंदे याही शेतकऱ्याचे दोन लाख रुपये नुकसान झाले आहे ज्ञानेश्वर शिंदे या शेतकऱ्याचे सात लाख रुपये नुकसान झाले आहे.


या आगीच्या घटनेत सुभाष शिंदे, बालाजी शिंदे, लक्ष्मण शिंदे या शेतकऱ्याचे दोन लाख रुपये नुकसान झाले आहे अशोक शिंदे याही शेतकऱ्याचे तीन लाख रुपये नुकसान झाले आहे या शेतकऱ्यांचे कुटुंब सर्व उघड्यावर आले आहे या शेतकऱ्यांना शासनाकडून लवकरात लवकर मदत करण्याची मागणी राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस परमेश्वर इंगोले यांनी केली आहे शासनाकडून लवकरात लवकर मदत मिळावी अशी मागणी केली आहे घटनास्थळी परमेश्वर इंगोले भेट कुटुंबाला आधार दिला आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या