🌟महाराष्ट्रातील चर्चित चेहरे म्हणुन प्रदिप खाडे यांचा केंद्रिय मंत्री भागवत कराड यांच्या हस्ते सन्मान.....!


🌟दिव्य मराठीच्या वतिने महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील निवडक व्यक्तींची चर्चित चेहरे या सन्मानासाठी निवड केली जाते🌟

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- संपूर्ण महाराष्ट्रातातुन राजकिय,सामाजीक,शैक्षणिक,धार्मिक व इतर क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या व्यक्तींचा देशातील सर्वात मोठ्या वृतपत्र समुह असलेल्या भास्कर ग्रुपच्या दिव्य मराठी च्या वतिने सोमवार दि.11 मार्च रोजी महाराष्ट्रातील चर्चित चेहरे म्हणुन सन्मान करण्यात आला.यात कृषीमंत्री ना.धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव,कै.रामभाऊ (अण्णा) खाडे सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रदिप खाडे यांचा केंद्रिय मंत्री भागवत कराड यांच्या हस्ते सहकुटुंब सन्मान करण्यात आला. 


   दिव्य मराठीच्या वतिने महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील निवडक व्यक्तींची चर्चित चेहरे या सन्मानासाठी निवड केली जाते.कृषीमंत्री ना.धनंजय मुंडे यांचे विश्वासु असलेले प्रदिप खाडे यांनी कै.रामभाऊ (अण्णा) खाडे या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून दिंद्रुड,लातुर परिसरात अनेक शैक्षणीक संस्था उभारुन गोरगरीब विद्यार्थ्यांना त्यांच्याच भागात दर्जेदार शिक्षण उपलब्ध करुन दिले आहे.नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव म्हणुन त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे.शैक्षणीक क्षेत्रातील त्यांच्या कार्याची दखल घेत दिव्य मराठीने चर्चित चेहरे या सन्मासाठी महाराष्ट्रातुन त्यांची निवड केली होती.सोमवार दि.11 मार्च रोजी छत्रपती संभाजीनगर येथील हॉटेल फर्न रेसिडेन्सीच्या सभागृहात दिव्य मराठीचे सीईओ निशीत जैन,युनिट हेड सुभाष बोंद्रे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या सन्मान सोहळ्यात केंद्रिय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांच्या हस्ते सहकुटुंब सन्मान करण्यात आला.यावेळी सत्कारास उत्तर देताना प्रदिप खाडे म्हणाले की, कृषीमंत्री ना.धनंजय मुंडे साहेबांच्या कल्पनेतील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना आपल्याच भागात दर्जेदार व उच्च शिक्षण देण्यासाठी आपण कटिबध्द असुन मराठी शाळांमधुनही सीबीएसई शिक्षणप्रणाली लागु करण्याची गरज असल्याचे सांगितले.या कार्यक्रमास महाराष्ट्रातुन सर्वच क्षेत्रातील कार्य करणार्या मान्यवरांची तसेच वैजनाथ भोसले बापू, संजय हिबाने, ज्ञानेश्वर मगर सर, रामराजे तोडकर सर, पत्रकार धनंजय आढाव, पत्रकार महादेव गित्ते आदी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या