🌟परभणी लोकसभा मतदारसंघात येत्या २६ एप्रिल रोजी होणार मतदान.....!


🌟निवडणूक आयोगाने निवडणूकीचा कार्यक्रम केला जाहीर : राज्यात सर्वत्र आदर्श आचारसंहीता लागू🌟 

परभणी (दि.१६ मार्च) : देशात लोकसभा निवडणुकीची घोषणा आज शनिवार दि.१६ मार्च २०२४ रोजी करण्यात आली असून निवडणूक आयोगाने आज शनिवारी पत्रकार परिषद घेत निवडणुकांची घोषणा केली देशात एकूण ७ टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार असून या सात टप्प्यांमध्ये विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या दिवशी निवडणुका होणार आहेत तर महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यात मतदान पार पडणार आहे महाराष्ट्रातील दुसर्‍या टप्प्यात म्हणजे दि.२६ एप्रिल २०२४ रोजी परभणी लोकसभा मतदारसंघातील सुज्ञ मतदार मतदान प्रक्रियेत भाग घेऊन आपल्या अमुल्य मतादानाने आपला लोकसभा सदस्य अर्थात खासदार निवडतील.

            लोकसभा निवडणुकीच्या तारखा आज शनिवारी निवडणूक आयोगाने जाहीर केल्या. त्याप्रमाणे संपूर्ण देशात सात टप्प्यात निवडणूका होणार आहेत. यासोबतच काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकाही जाहीर होणार आहेत. लोकसभा आणि काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक आयोगाने आज शनिवारी दुपारी ०३-०० वाजता पत्रकार परिषदेतून तपशीलवार जाहीर केले.

          सध्याच्या लोकसभेचा कार्यकाळ १६ जून २०२४ रोजी संपत असून त्यापूर्वी नवीन सरकार स्थापनेची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कूमार यांनी ही घोषणा केली आहे. लोकसभेच्या निवडणुकांना १९ एप्रील २०२४ पासून सुरुवात होणार आहे. तर ०४ जूनला निकाल लागणार आहे. दिड कोटी कर्मचारी निवडणूक प्रक्रिया पार पाडतील. देशात ९७ कोटीहून अधिक मतदार आहेत. तर साडे दहा लाखांहून अधिक मतदान केंद्र आहेत. ०७ टप्यांमध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत.

         पहील्या टप्प्यातील निवडणूक १९ एप्रील, दुसरा टप्प्यातील २६ एप्रिल, तिसरा टप्प्यातील ०७ मे,चौथा टप्पा १३ मे,पाचवा टप्पा - २० मे,सहावा टप्पा २५ मे,तर सातवा टप्प्यातील निवडणूकांसाठी ०१ जूनला मतदान होणार आहे. महाराष्ट्रात ०५ टप्प्यात निवडणूका होणार आहे.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या