🌟नांदेड जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालय सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सुरु राहणार....!


🌟असे प्रशासकीय अधिकारी एस.डी.कल्याणकर यांनी म्हटले आहे🌟 

नांदेड (दि.21 मार्च) :- वार्षिक बाजारमुल्य दर तक्ते 1 एप्रिलपासून बदलणार आहेत. मार्च महिन्यात दस्तऐवज नोंदणीसाठी होणारी गर्दी व तसेच आर्थिक वर्ष 2023-24 या वर्षाचा इष्टांक पूर्ण करण्याच्या दृष्टीने तसेच महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना या संबंधीचे कामकाज व दस्त नोंदणीसाठी आलेल्या सुट्टया लक्षात घेता जनतेच्या सोयीच्या दृष्टीने दस्त नोंदणीसाठी सर्व दुय्यम निबंधक, सह जिल्हा निबंधक कार्यालये 23 व 24 मार्च आणि 29 ते 31 मार्च रोजी सुरु राहणार आहेत. संबंधीतांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा प्रशासकीय अधिकारी एस.डी. कल्याणकर यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या