🌟बाॅक्सींगमध्ये भारतातुन दुसर्‍या क्रमांकाने सिल्वर मेडल घेतलेल्या गार्गी राऊतच्या पाठीवर लोकप्रतिनिधीची कौतुकाची थाप...!


🌟'गार्गीने' चमकवले देशपातळीवर नाव;गार्गी राऊतने केले बाॅक्सिंगमध्ये महाराष्टाचे प्रतिनीधीत्व🌟 

🌟वाशिम जिल्ह्यातील पहिली बाॅक्सिंग चॅम्पीयन ठरली गार्गी🌟


फुलचंद भगत

वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर येथील रहिवाशी असलेल्या गार्गी राजेश राऊत हिने महाराष्टाचे प्रतिनीधीत्व करत राष्टीय चॅम्पीयनशिपमध्ये भारतातुन दुसरा क्रमांक पटकावत सिल्वर पदक मिळवुन सर्वञ नावलौकीक केले आहे.या यशाबद्दल खासदार भावनाताई गवळी तसेच शिक्षक आमदार किरण सरनाईक यांनी गार्गीची भेट घेवुन सत्कार करुन कौतुकाची थाप दिली व ऊज्वल भविष्यासाठी शुभेच्छाही दिल्या.


           मंगरुळपीरसारख्या छोट्या शहराचे नाव देशपातळीवर चमकवुन महाराष्टाचे प्रतिनिधीत्व करत भारतातुन दुसरा क्रमांक पटकावुन बाॅक्सींग स्पर्धेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.तिसर्‍या सबज्युनिअर मुलींच्या बाॅक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धा 19 ते 25 मार्च 2024 दरम्यान ग्रेटर नोएडा उत्तरप्रदेश येथे पार पडली. यामध्ये देशातील 32 राज्यातील बॉक्सर सहभागी झाले होते.इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्रातील मुले, मुली सुद्धा या देश पातळीवरील स्पर्धेत सहभागी झाले होते.यात अकोल्यातील 8 मुले व 2 मुलींची ह्या महाराष्ट्रातील संघात निवड झाली होती. यात सध्या अकोला येथे शिक्षण घेत असलेली मंगरुळपीर तालुक्यातील कु. गार्गी राजेश राऊत हिची सुद्धा या राष्ट्रीय स्पर्धेकारिता निवड झाली होती.या स्पर्धेत तिचा पहिला सामना मध्य प्रदेश, दुसरा उत्तर प्रदेश, तिसरा गुजरात च्या मुलीसोबत झाला यात तिने आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत फायनल मध्ये प्रवेश केला. फायनल मध्ये तिचा सामना चंदीगढ च्या इशिका सोबत झाला. रजत पदक प्राप्त करत गार्गी ने 55 ते 58 या वजन गटात देशातून दुसरा क्रमांक पटकाविला.या यशामुळे मंगरुळपीरसह वाशिम जिल्ह्याचे नाव देशपातळीवर चमकले.वाशिम यवतमाळ मतदार संघाच्या खासदार भावनाताई गवळी आणी शिक्षक आमदार किरण सरनाईक यांनी गार्गीचा सत्कार करुन मिळवलेल्या यशाबद्दल तोंडभरुन कौतुक केले.विविध मान्यवरांनीही भावी वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या