🌟देशात केंद्र सरकारने लागू केलेल्या नागरिकता संशोधन अधिनियम कायद्याच्या विरोधात परभणीत जोरदार निदर्शने....!


🌟सोशल डेमोक्रॅटीक पार्टी इंडियाचे जिल्हाध्यक्ष सय्यद इर्शाद अली यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले निदर्शन🌟


 
परभणी (दि.१५ मार्च) : परभणीत आज शुक्रवार दि.१५ मार्च रोजी देशात केंद्र सरकारने लागू केलेल्या नागरिकता संशोधन अधिनियम (सीएए) या कायद्याच्या निषेधार्थ येथील सोशल डेमोक्रॅटीक पार्टी इंडियाच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली.

 परभणी जिल्हा सोशल डेमोक्रॅटीक पार्टी इंडियाचे जिल्हाध्यक्ष सय्यद इर्शाद अली, उपाध्यक्ष अहमद अन्सारी, शेख जावेद, बशीर अहेमद, उबेद रहेमान, मुफ्ती अब्दुल अजीम हाश्मी, सय्यद हाफीज अतीक, सय्यद मुजम्मील मुल्ला यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यकर्त्यांनी मोठी मोटारसायकल रॅली काढून जिल्हाधिकारी कार्यालय गाठले व निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती अनुराधा ढालकरी यांना निवेदन सादर केले. या देशाचा एक नागरीक या नात्याने समता आणि न्यायाची तत्वे जपण्यासाठी सगळे प्रयत्नरत असतांना या पध्दतीचा कायदा लागू करीत भेदभाव केला जातो आहे. त्यातून धर्मनिरपेक्षतेस तडा दिला जात असून भारतीय संविधानाच्या विरोधातील या कृतीचा सर्वस्तरावर मोठा रोष व्यक्त होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने हा कायदा तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी या आंदोलनकर्त्यांनी केली.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या