🌟परभणी जिल्ह्यातील ५ जणांना सामाजिक कार्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे पुरस्कार जाहीर....!


🌟बृहन्मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण🌟

परभणी (दि.12 मार्च) : समाजातील दुर्बल व पिडीत घटकांसाठी काम करीत असलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन राज्य शासनाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत देण्यात येतात. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने सन 2019-20, 2020-21, 2021-22 आणि 2022-23 या चार वर्षाचे एकत्रित पुरस्कार जाहिर केले आहेत. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्कार व्यक्ती/संस्था, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राविण्य पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार व्यक्ती/ संस्था, शाहू फुले आंबेडकर परितोषिक, संत रविदास पुरस्कार, कर्मवीर पद्मश्री दादासाहेब भाऊराव कृष्णराव गायकवाड पुरस्कार व्यक्ती/ संस्था शासनाने जाहिर केले असुन, परभणी जिल्ह्यातील पाच सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार जाहिर करण्यात आले आहे.

यामध्ये परभणी येथील श्रीमती आशाबाई रोहिदास गायकवाड यांना सन 2019-20 चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्कार तर सोनपेठ तालूक्यातील लोकरवाडी येथील कचरुवा आश्रोबा शिंदे यांना सन 2019-20 चा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार, गंगाखेड तालूक्यातील रुमणा येथील श्रीमती वेणु नारायण जोगदंड यांना सन 2020-21 चा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार, सेलू तालूक्यातील आंबेडकर नगर येथील नथुराम मुजांजी अंगुरे यांना सन 2020-21 चा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार, आणि परभणी येथील विश्वनाथ बंसीधर गवारे यांना सन 2020-21 चा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार जाहिर झाले आहेत.

पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे सहाय्यक आयुक्त श्रीमती गिता गुट्टे यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. सदर पुरस्कार वितरण सोहळा मुख्यमंत्री व इतर मान्यवर मंत्री यांच्या उपस्थितीत नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिग आर्टस, जमशेदजी भामा नाट्यगृह, एन.सी.पी.ए मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई येथे पार पडणार असल्याचे सहायक आयुक्त श्रीमती गिता गुट्टे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे......

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या