🌟परभणी जिल्ह्यातील सामाजिक/धार्मिक क्षेत्रांसह न्यायपालिका क्षेत्रातही स्वकर्तृत्वाची छाप सोडणार व्यक्तीमत्व....!


🌟जिल्ह्यातील विश्वासपात्र वकीलांच्या श्रेणीत मोडणारे विधीज्ञ ॲड.रोहीदास जोगदंड यांची नुकतीच नोटरी पदावर निवड🌟 

✍🏻व्यक्ती आणि व्यक्तीमत्व - चौधरी दिनेश (रणजित)

परभणी जिल्ह्यातील पुर्णा तालुक्यातल्या मौजे गौर येथील एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील तरुण स्वकर्तृत्वाने संपूर्ण जिल्ह्यात स्वतःचे अस्तित्व निर्माण करुन सामाजिक/धार्मिक क्षेत्रासह न्यायपालिका क्षेत्रातही छाप सोडू शकतो यावर कदाचित कोणाचा विश्वास बसणार नाही परंतु पुर्णा-नांदेड राज्य मार्गावरील मौ.गौर येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या ॲड.रोहीदास जोगदंड यांचा हा यशस्वी प्रवास निश्चितच तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल असे म्हणणें यत्किंचितही चुकीचे ठरणार नाही.

पुर्णा तालुक्यातील गौर गावातील सोमेश्वर विद्यालयात एसएससी (इयत्ता १० वी) पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ॲड.रोहिदास जोगदंड यांनी पुर्णेतील श्री गुरु बुध्दीस्वामी महाविद्यालयात एच.एस.सी (इयत्ता १२ वी) पर्यंतचे शिक्षण पुर्ण केल्यानंतर पुढील शिक्षणासाठी स्वातंत्र्य सैनिक सुर्यभानजी पवार महाविद्यालयात प्रवेश मिळवून ग्रॅज्युएशन कम्प्लीट केले,अगदी बालवयापासूनच त्यांची वकील होण्याची दृढ इच्छा असल्याने त्यांनी यानंतर नांदेड येथील नारायणराव चव्हाण विधी महाविद्यालयात प्रवेश मिळवला. पुढे बि.ए, बी.एड, एल.एल.बी, डि.एल.एल.पर्यंतचे शिक्षण घेतले. त्यांनी डि.एल.एल. मध्ये नारायणराव चव्हाण विधी महाविद्यालयात त्यांनी प्रथम क्रमांक तर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात द्वितीय क्रमांक पटकावला होता.

परभणी जिल्ह्यातील पुर्णा तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातील न्यायपालिका क्षेत्रात अत्यंत बुद्धिमान अधिवक्ता म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायद्यांतर्गत कारवाई झालेल्या आरोपीच्या सुटकेसाठी अत्यंत अभ्यासपूर्ण लढा देऊन त्याला जमीन मिळवून देण्याची जवाबदारी यशस्वीरीत्या पार पाडणारे अत्यंत अभ्यासू वकील म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं न्यायपालिका क्षेत्रासह धार्मिक/सामाजिक क्षेत्रात देखील त्यांनी आपल्या कर्तृत्वाची छाप सोडली असून श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक विकास केंद्र अमृत नगर पुर्णा या केंद्राचे तालुका प्रतिनिधी म्हणून त्यांनी स्वतःला धार्मिक व आध्यात्मिक कार्यात झोकून दिले असून सत्यासाठी प्रखरपणे लढा उभारणारे व्यक्तीमत्व म्हणून त्यांच्याकडे आदराने बघितले जाते.

पुर्णा तालुका वकील संघाचे तब्बल दोन वेळेस उपाध्यक्ष राहिलेले ॲड.रोहिदास जोगदंड यांच्यातील कर्तृत्व क्षमता पाहता त्यांना अधिवक्ता परिषदेच्या मान्यवर वरिष्ठ पदाधिकारी यांनी पुर्णा तालुका अधिवक्ता परिषदेच्या महामंत्री पदाची जबाबदारी देखील सोपवली असून ही जवाबदारी देखील ते यशस्वीरीत्या पार पाडीत आहेत नुकतीच ॲड.रोहिदास जोगदंड यांची भारत सरकारच्या नोटरी पदावर निवड झाली असून त्यांच्या या निवडीबद्दल त्यांच्यावर आप्त स्वकीयांसह मित्र परिवाराकडून देखील शुभेच्छांचा वर्षाव होत आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या