🌟परभणी महानगर पालिका कर्मचार्‍यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा....!

 


🌟या मोर्चात महानगरपालिकेचे सर्व विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते🌟

परभणी (दि.05 मार्च) : परभणी महानगरपालिकेच्या कर्मचार्‍यांनी गेल्या काही दिवसांपासून आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत आंदोलन सुरू केले असून आज मंगळवार दि.05 मार्च 2024 रोजी दुपारी महानगर पालिका कर्मचाऱ्यांनी परभणिी ल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार धडक मोर्चा काढला.

        महानगरपालिका अधिकारी-कर्मचारी संघटनेचे नेते के.के. आंधळे, संघटनेचे अध्यक्ष नासेर खान वहीद खान यांच्या नेतृत्वाखाली शनिवार बाजार ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा धडक मोर्चा काढण्यात आला या मोर्चात महानगरपालिकेचे सर्व विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

           दरम्यान, महानगरपालिकेतील निवृत्त कर्मचार्‍यांच्या वेतनासाठी नगरपालिका कर्मचार्‍यांप्रमाणे शंभर टक्के अनुदान द्यावे, वाढीव जीएसटी मिळण्यासाठी सादर केलेला प्रस्ताव मंजूर करण्यात यावा, सेवानिवृत्त कर्मचार्‍यांचे चार ते पाच महिन्याचे वेतन अदा करण्यात यावे, सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम देण्यात यावी, सातव्या वेतन आयोगानुसार पदोन्नती देण्यात यावी, जुनी पेन्शन योजना लागू करावी, प्रभारी पदावर कार्यरत असणार्‍या कर्मचार्‍यांना सदरील पदावर कायम करून घेण्यात यावे यासह अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन करीत प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या