🌟परभणी शहरातील अंबिका नगर व सम्राट नगर येथील विकासकामांचा उद्घाटन सोहळा संपन्न....!


🌟परिसरातील बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेल्या नालीच्या कामांची 40 लाख रुपयांच्या शासकीय विकासनिधीतून सुरुवात🌟 


परभणी :-  परभणी शहरातील अंबिका नगर व सम्राट नगर येथील माघील बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेल्या 40 लक्ष रुपयांच्या नालीच्या कामांचे दि.28 फेब्रुवारी 2024 रोजी उद्घाटन रामचंद्रराव रोडे बाबा,जनसेवक धम्मदिपभाऊ रोडे, माजी नगरसेवक विश्वजीतभाऊ बुध्दवंत, अतुल भाऊ वैराट,बरे सर,विनोद राठोड, संघर्ष चाटसे, ऊत्तम शिवभगत सर,पारडकर दादा,प्रकाश आलणे,साहेबराव गायकवाड,महेंद्र कीर्तने,सोपान जडे, दिपक जोंधळे,धम्मरत्न खाडे,जानकीराम ढगे, प्रदीप जाधव,विनोद कांबळे,व समस्त अंबिकानगर व सम्राट नगर येथील नागरिकांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये करण्यात आले, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले या शब्दात नागरिकांनी रोडे परिवाराचे कौतुक केले, बौध्दवासी महानगरसेवक अमरदीपभैय्या यांचे कार्य आपण यशस्वीपणे सुरु ठेवले आहे,आम्ही सदैव आपल्या सोबतच आहोत, असे मत येथील नागरिकांनी व्यक्त केले असून, सुरु असलेल्या विविध विकास कामाबद्दल समाधान व्यक्त केले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या