🌟सायखेडा येथील हिरामन काळे यांचा असाही दिलदारपणा ; गरीब गरजुंना योजनेचा लाभ मिळावा म्हणून नाकारले घरकुल...!


🌟घरकुल यादीतील अपाञ लोकांना वगळुन गरीब गरजु व पाञ लाभार्थ्यांनाच लाभ देण्याची मागणी🌟

फुलचंद भगत

वाशिम :-मंगरुळपीर तालुक्यातील सायखेडा येथे 'मोठ्या दिलाचे राजे' म्हणून एक व्यक्तीमत्व अनूभवयास आले आहे.येथील दिलदार आणी गोरगरीब व गरजुंना मदत करण्याची सदैव भुमीका असणारे हिरामण काशीराम काळे यांनी स्वतःला घरकुलाची गरज असतांनाही मनाचा मोठेपणा दाखवत पिएम मोदी आवास योजनेचा लाभ नाकारल्याचे कळले.

              मंगरुळपीर तालुक्यातील सायखेडा हे अनेकदा चर्चेत राहिलेलं गाव आहे.येथीलच हिरामण काळे हे परिस्थीतीने साधारणच.घरही कच्चेच.असे असतांना ग्राम प्रशासनाने त्यांना घरकुल मिळावे म्हणून यादित नाव घेतले आणी फाईलही तयार केली.परंतु माझ्यापेक्षाही अजुन खुप गरीब आणी गरजु लाभार्थी असल्याने प्राधान्याने त्यांना आवास योजनेचा लाभ मिळायला हवा असा मनाचा मोठेपणा करुन मला सदर घरकुल योजनेचा लाभ नको असे म्हणून घरकुल नाकारले.सायखेडा गावात जास्तीत जास्त लोकांना घरकुलाचा लाभ मिळावा यासाठी यादी बनवली परंतु निवडक जवळच्या आणी हितसबंध असणार्‍याच व जे सधन आहेत व याआधीही घरकुल योजनेचा लाभ घेतलेले आहेत अशांचाही समावेश असल्याची जोरदार चर्चा सुरु असतांना दुसरीकडे मनाचा मोठेपणा करत घरकुल नको असे म्हणणारे काळे यांची आता चर्चा होत आहे.सायखेडा येथील घरकुल यादीची वरिष्ठ प्रशासनाने सखोल चौकशी करुन अपाञ लाभार्थ्यांना वगळुन फक्त गरजु गरीब आणी पाञ लाभार्थ्यांनाच घरकुल योजनेचा लाभ द्यावा अशी मागणी जोर धरत आहे.

                    राज्यातील ज्या इतर मागासवर्गीय OBC प्रवर्गातील कुटुंबांची घरे कुडा- मातीची आहेत किंवा जी कुटुंबे बेघर आहेत अशा लाभार्थ्याना घरे उपलब्ध करुन देण्यासाठी सन 2023 पासून “मोदी आवास घरकुल योजना” राज्यात राबविण्यात येत आहे.प्रधानमंत्री आवास योजना केंद्र पुरस्कृत योजना असून सन 1995-96 पासून स्वतंत्रपणे राबविली जाते.

ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील बेघर/कच्चेघर असलेल्या कुटूंबांना घरकुल बांधकामासाठी अर्थसहाय्य देणे हा योजनेचा उद्देश आहे.सायखेडा येथील काळे यांनी घरकुल नाकारले असल्याने त्यांच्याप्रमाणेच इतरांनीही ज्यांना गरज नाही अशांनी मोठेपणा दाखवुन गरीब गरजु लोकांनाच या योजनेचा लाभ द्यावा अशी मागणीही यानिमित्ताने होत आहे......


प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या