🌟परभणीचा बेसबॉल खेळाडू आकाश साबणे याची राष्ट्रीय पंच म्हणून निवड....!

 

🌟तर सायमा बागवान हिची महाराष्ट्र मुलींच्या संघाची कोच म्हणून निवड🌟


पंजाब राज्यातील संगरुर येथे २२ते २६ मार्च या कालावधीत ३१वी राष्ट्रीय ज्युनिअर बेसबॉल स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी परभणीचा बेसबॉल खेळाडू आकाश साबणे याची राष्ट्रीय पंच म्हणून निवड झाली आहे. तसेच सायमा बागवान हिची मुलींच्या संघाच्या कोच म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशनचे महासचिव राजेंद्र इकनकर, कोषाध्यक्ष अशोक सरोदे, प्रा. किरण सोनटक्के, परभणी जिल्हा बेसबॉल असोसिएशनचे सचिव शंकर शहाणे, उपाध्यक्ष राजकुमार भामरे, उपाध्यक्ष संतोष गायकवाड, संतोष कुरुळे, रामा इंगोले, रवी उबाळे यांनी आकाश व सायमा या दोघांचे अभिनंदन केले आहे

परभणी जिल्हा बेसबॉल असोसिएशन परभणीचे सर्व खेळाडूंच्या वतीने  या दोघांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शुभम सपाटे, अजिंक्य दूध, यशोधन कराटे, आशिष शिंदे, सत्यम सपाटे, रोहित इंगोले, धनंजय काळे, महेश जाधव, अयोध्या बिल्डे, अनिकेत लहाने, वीरेन भराडे, सिद्धांत जाधव, जयंत अंभोरे, सचिन जोगदंड, तानाजी गायकवाड, विजय कदम, राजेश राऊत, वैभव, मुंजा , संघर्ष आदी उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या