🌟नांदेड येथील गुरुद्वारा यात्री निवासस्थानांतील कर्मचाऱ्यांच्या मनमानीमुळे गुरुद्वारा येणाऱ्या तिर्थयात्रींची गैरसोय.....!


🌟सामाजिक कार्यकर्ते जगदिपसिंघ नंबरदार यांची प्रशासक डॉ.विजय सतबीरसिंघ यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार🌟


नांदेड (दि.२३ मार्च) - जगभरातुन सचखंड गुरुद्वारा दर्शनासाठी व होला-मोहल्ला कार्यक्रमाला लाखो भाविक येत असतात त्यांच्या राहण्यासाठी गुरुद्वारा प्रशासनाने यात्री निवासांची सुविधा उपलब्ध केली आहे परंतु येथे ठाण मांडून राहिलेल्या कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे येणाऱ्या भाविकांची गैरसोय होत असल्याची तक्रार स.जगदिपसिंघ नंबरदार यांनी गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉ.विजय सतबिरसिंघ यांच्याकडे केली आहे.

                   जगभरात प्रसिध्द असलेले सिख धर्मियांच्या पाच पवित्र तख्तांपैकी एक असलेल्या सचखंड गुरुद्वारा दर्शनासाठी दररोज हजारो भाविक येतात त्यांच्या राहण्यासाठी गुरुद्वारा बोर्ड प्रशासनाने यात्री निवासांच्या माध्यमातुन मोठी सुविधा उपलब्ध करुन दिली आहे गुरुद्वारा बोर्डाच्या वतीने पंजाब भवन यात्री निवास एनआरआय यात्री निवास, गुरु अंगददेवजी यात्री निवास,एसजीपीसी यात्री निवास, गुरु ग्रंथ साहेबजी भवन,गुरुद्वारा परिसर,भाई दयासिंगजी यात्री निवास,बाबा मोनीजी यात्री निवास व रामदासजी यात्री निवासच्या माध्यमातुन सुमारे सातशे ते आठशे रुम उपलब्ध आहेत गुरुविंदरसिंघ बावा मुंबई यांचे पंजाब भवन मध्ये जवळपास शंभरावर रुम बुक असतात आणि अंगददेवजी यात्री निवास व एसजीपीसी यात्री निवास ही त्यांच्या कडे बुक असते. इतके रुम जर त्यांना देण्यात येतील तर दुसऱ्या येणाऱ्या यात्रेकरुंना रुम कसे भेटतील त्यामुळे त्या यात्रेकरुंना त्रास सहन करावा लागतो. हे विचार करणे योग्य आहे परंतु येणाऱ्या यात्रेकरू भाविकांना यात्री निवासांमध्ये मागील चार ते पाच वर्षापासुन ठाण मांडुन राहिलेल्या कर्मचाऱ्यांच्या मनमानीमुळे रुम उपलब्ध होण्यास अडथळे निर्माण होत असल्याने तिर्थयात्री भाविकांना खाजगी लॉज व हॉटेलचा महागडा पर्याय निवडावा लागत आहे दिर्घ काळापासुन ठाण मांडुन राहिलेल्या कर्मचारी यात्री निवासांमध्ये बोगस नावाने बुकिंग करुन रुम अडवुन ठेवत असून आलेल्या नवीन भाविकांना रुम उपलब्ध नसल्याचे सांगुन अडवणुक करीत असल्यामुळे गुरुद्वारा प्रशासकाची बदनामी होत आहे असेही स.जगदीपसिंघ नंबरदार यांनी निवेदनात म्हटले आहे.....




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या