🌟परभणीत जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे आयोजन.....!


🌟आयएमए हॉल,कल्याण नगर येथे जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद संपन्न🌟 

परभणी (दि.०५ मार्च) :  उद्योग संचालनालय मुंबई व जिल्हा उद्योग केंद्र परभणी यांच्या वतीने आयएमए हॉल, कल्याण नगर येथे जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हास्तरावर गुंतवणूक आकर्षित करणे, जिल्हास्तरीय गुंतवणूकदार आणि व्यवसायांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करुन देणे, जिल्ह्याला विकासाचा केंद्र बिंदू मानून जिल्ह्याच्या व राज्याच्या विकासाला चालना देणे, उद्योग क्षेत्रामध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी गुंतवणूकदार व व्यवसाय यांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याकरीता गुंतवणूक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी उपविभागीय अधिकारी दत्तु शेवाळे, जिल्हा जिनिंग प्रेसिंग असोसिएशनचे अध्यक्ष ओमप्रकाशजी डागा, एमआयडीसी लघु उद्योग संघटनेचे सचिव प्रमोद वाकोडकर, केशवराज कॉटन क्लस्टर सेलूचे रामेश्वर राठी, उद्योग संचालनालय मैत्री कक्षाचे उमेश पाटील, सनदी लेखापाल शाम धुत, क्लस्टर समूहातील सर्व सदस्य, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, जिल्ह्यातील बँका, सर्व उद्योजक संघटना, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, मिटकॉन, कौशल्य विकास व रोजगार व जिल्ह्यातील संबंधीत शासकीय यंत्रणांचे प्रमुख उपस्थिती होती. 

जिल्हास्तरीय परिषदेतील कार्यक्रमामध्ये जिल्ह्यातील प्रमुख उद्योग क्षेत्राबाबत चर्चासत्र, गुंतवणूकीच्या संधी, इतर क्षमता असलेल्या क्षेत्रातील गुंतवणूक व व्यवसाय संधीबाबत चर्चा, सामंजस्य करार स्वाक्षरीबाबत कार्यक्रम, उद्योजकांचे अनुभव इ. बाबींचा समावेश होता, त्यात प्रातिनिधीक स्वरुपात जिल्ह्याच्या उत्पादनांचे प्रदर्शन, निर्यातक्षम उत्पादने भौगोलिक मानांकने असलेली उत्पादने, एक जिल्हा एक उत्पादन, जिल्ह्यातील स्थापित औद्योगिक समुह, विविध योजनांचे लाभार्थी यांची उत्पादने यांचे प्रदर्शन भरविण्यात आले. त्याचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांचे हस्ते करण्यात आले.

या परिषदेत जिल्ह्यामध्ये प्रस्थापित होणाऱ्या नवीन 41 उद्योग घटकांचे सामंजस्य करार करण्यात आले. त्यामधून जिल्ह्यामध्ये  400 कोटीची गुंतवणूक होणे अपेक्षीत आहे. तसेच यातून जवळपास 1 हजार 200 लोकांना रोजगार उपलब्ध होईल.

या परिषदेस महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, मैत्री कक्ष, उद्योग संचालनालय, मुंबई सीडबी बँक, जिल्ह्यातील बँका, उद्योजक संघटना, शैक्षणिक संस्था, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, मिटकॉन, कौशल्य विकास व रोजगार व जिल्ह्यातील संबंधीत शासकीय यंत्रणांचे प्रमुख, उद्योजक संघटना, उद्योजक, शेती उत्पादक संस्था व नव उद्योजक उपस्थित होते.  

कार्यक्रमाच्या सुरवातीस जिल्हा उद्योग केंद्र महाव्यवस्थापक अमोल बळे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमासाठी जिल्हा उद्योग केंद्रातील सर्व अधिकारी/कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. तसेच एस.एच.पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले......

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या