🌟हिंगोली जिल्ह्यातील पानकनेरगावात महाशिवरात्री महोत्सव उत्साहात संपन्न....!


🌟भव्य शोभायात्रेतील हर हर महादेवाच्या जयघोषाने पानकनेरगाव नगरी दुमदुमली🌟

🌟देव देवतांच्या वेशातील सजिव देखाव्यांसह निघालेल्या शोभायात्रेने वेधले सर्वांचेच लक्ष🌟 

✍🏻शिवशंकर निरगुडे : हिंगोली 

हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव येथील जागृत असलेल श्री माणकेश्वर बाबा यांचे देवस्थान आहे. मानकनेश्वर बाबा हे मंदिर प्राचिन काळापासून असलेल भाविकांच जागृत देवस्थान आहे येथील शेकडो भाविक दररोज दर्शन घेण्यासाठी येत असतात आज ८ मार्च रोजी महाशिवरात्र निमित्त महोत्सव पहायला मिळाला  या महोत्सव निमित्त पानकनेरगाव पंचक्रोशीतील व गावातील हजारो भाविक भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला यावेळी भाविकांची मोठी गर्दी पहायला मिळाली.भगवान शंकराच्या भक्तांसाठी महाशिवरात्री खूपच महत्त्वपूर्ण असते. या दिवशी भाविक भगवान शंकराची मनोभावे पूजा करतात. व तसेच शिवलिंगावर अभिषेक करून शंकराला प्रसन्न करण्यासाठी अनेकजण त्यांच्या आवडीचे पदार्थ, फूल अर्पण करत असतात तसेच निरंकार उपवास सुद्धा करतात. महाशिवरात्रीनिमित्त धार्मिक, भजन, कार्यक्रमाचे आयोजन केले जाते महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर महादेव मूर्तीच्या दर्शनासाठी भाविक भक्तांनी हर हर महादेव जय घोषात हजारो भाविकांनी दर्शन घेतले.


या भाविक भक्तांनी परिसर जयघोषाने दणाणून गेला. रात्रीच्या बारा वाजल्यापासून भाविक भक्तांनी श्री मानकेश्वर बाबा मूर्तीच्या अभिषेकासाठी रात्री १२ वाजल्यापासून रांगा लावून महाअभिषेक करण्यात येतो  जागृत असलेल्या मानकेश्वर देवस्थान मंदिरात जवळपास खेरखेडा, म्हाळशी, खोडके शेगांव, सुलदली, साखरा, कहाकर, जयपुर, वाढोणा, शिंदेवाडी, वटकळी, दाताडा, साखरा, कोळसा, अशा जवळपास शेकडो गावातील भाविक मक्तांनी दर्शन घेत असतात  गावातील ग्रामस्थांचे नातेवाईक दूरवरून महा शिवरात्रीचा सोहळा पहायला येतात  महाशिवरात्रीचे औचित्य साधून मानकेश्वर बाबाचे दर्शन घेऊन रात्री ८ सुमारास दिंडीचे गावांमध्ये मिरवणूक काढल्या जाते मिरवणुक मार्गे प्रत्येकाच्या अंगणात पालखी मार्गे देखावा रांगोळी काढून मिरवणूक काढली जाते.

बाबाची मिरवणूक पाहण्यासाठी तसेच ग्रामस्थ व भाविक भक्तांची मोठी प्रमाणात गर्दी जमते व तसेच यावेळी महादेव भक्तगणांनी साधू संत देव दैवताचे वेश परिधान करून यात्रेला शोभा वाढवली जाते यानिमित्ताने गावातील भाविकांकडून पूजा आरती करून स्वागत करून व तसेच चहापाणी नाश्ता जागोजागी भाविक भक्तांच्या कडून पालखीला वाटप केला जातो. सकाळी तीनच्या सुमारास पालखी सोहळा संपन्न दरम्यान पालखी तेल मंडळीमध्ये गल्लीत गारुड भारुड कार्यक्रम घेतला जातो व सकाळी आठच्या दरम्यान सकाळी जागृत असलेले देवस्थान श्री माणकेश्वर बाबा येथे महाप्रसादाचा आयोजन केले जाते तसेच दूरवरून आलेले दर्शनासाठी भाविक सकाळी महाप्रसाद घेऊन घेऊन परततात.....टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या