🌟नांदेड येथील विधिज्ञ ॲड.मोहम्मद शाहेद यांची भारत सरकारच्या नोटरी पदी नियुक्ती......!


🌟त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे🌟 

नांदेड (दि.१५ मार्च) - नांदेड जिल्हा व सत्र न्यायालय येथे वकिली व्यवसाय करणारे ॲड. मोहम्मद शाहेद मोहम्मद इब्राहिम यांची भारत सरकारच्या वतीने महाराष्ट्र राज्यासाठी केंद्रीय नोटरी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ॲड मोहम्मद शाहेद मोहम्मद इब्राहिम हे मागच्या १९ वर्षापासून नांदेड येथील ज्येष्ठ विधीज्ञ ॲड पि एस भक्कड यांच्या मार्गदर्नांशना खाली नांदेड जिल्हा व सत्र न्यायालयात वकिली व्यवसाय करतात. भारत सरकारच्या वतीने नोटरी म्हणून नियुक्ती झाल्या नंतर त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहेत. सदर नोट्रीच्या नियुक्तीसाठी तीन वर्षा पूर्वी अर्ज ऑनलाइन पद्धतीने मागविण्यात आले होते. त्यानंतर मागच्या वर्षी त्यांच्या मुलाखती ऑनलाइन घेण्यात आल्या. नंतर काल १४ मार्च रोजी विधी व न्याय मंत्रालय नई दिल्ली नोटरी सेल चे सचिव यांनी हि यादी जाहीर केली आहे.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या