🌟साखरा येथील जिल्हा परिषद शाळेने घडविला इतिहास : 'माझी शाळा,सुंदर शाळा' या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रात प्रथम....!


🌟प्रथम पारितोषिक पटकावुन राज्यात वाशिम जिल्ह्याचे नावलौकिक केले🌟 


वाशिम :-"मुख्यमंत्री" 'माझी शाळा, सुंदर शाळा' या योजनेअंतर्गत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा साखरा, पंचायत समिती वाशिम, जिल्हा परिषद वाशिम. या शाळेला "मुख्यमंत्री" 'माझी शाळा,सुंदर शाळा' या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रामध्ये प्रथम पारितोषिक पटकावुन जिल्ह्याचे नावलौकिक केले आहे.  

 जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत  ठाकरे, जिल्हाधिकारी एस. बुवनेश्वरी, जि. प. चे सीईओ वैभव वाघमारे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा आरोग्य व शिक्षण  सभापती चक्रधर  गोटे, शिक्षणाधिकारी राजेंद्र शिंदे यांनी शाळेतील सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.साखरा शाळेला हा बहुमान मिळवण्यासाठी जिल्हा प्रशासनाबरोबर, जिल्हा परिषदचे सर्व पदाधिकारी, अधिकारी आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र महाले आणि  सर्व सदस्य, ग्रामपंचायत सरपंच अनिताताई पांडुरंग राऊतयांच्यासह  ग्रामपंचायतचे सर्व सदस्य आणि मुख्याध्यापक अंबादास कर्‍हे यांच्यासह सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.  समस्त गावकरी मंडळी आणि विद्यार्थी यांनीही अथक परिश्रम घेऊन शाळेला  हा बहुमान प्राप्त करण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

"गुणवत्तेच्या नावाखाली पालकांचा कल खाजगी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे असतांना साखरा सारख्या शाळांचा आदर्श जिल्हा परिषद शाळेच्या सर्व शिक्षकांनी   घेण्यासारखा आहे." 

-चंद्रकांत ठाकरे,अध्यक्ष जिल्हा परिषद वाशिम

जि. प. चे माध्यमिक शिक्षणाधिकारी अहाळे, उप शिक्षणाधिकारी गजानन डाबेराव, उप शिक्षणाधिकारी गजानन बाजड, गट विकास अधिकारी गजानन खुळे, केंद्रप्रमुख अशोकराव महाले, केंद्रप्रमुख आनंद सुतार यांचेही मार्गदर्शन शाळेला लाभले आहे.

"साखरा येथील जि. प. शाळा  राज्यात प्रथम ठरली ही बाब आपल्या जिल्ह्यासाठी गौरवाची आणि सर्व जि.प. शाळांसाठी प्रेरणादायी आहे. यासाठी या शाळेतीचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मनापासुन खुप खुप अभिनंदन. तसेच शाळा व्यवस्थापन समितीसह शाळेच्या विकासात योगदान दिलेल्या  सर्वसामान्य नागरिकांचेही खुप खुप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. जिल्ह्यातील इतर शाळा सुध्दा साखरा जिल्हा परिषद शाळेपासून प्रेरणा घेऊन त्यांच्या पावलावर पाऊल टाकत पुढे जातील अशी आशा आहे."

- वैभव वाघमारे, सीईओ जिल्हा परिषद वाशिम

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या