🌟रेल्वे डिझेल चोरी प्रकरणी खासदारांनी लोकसभेत प्रश्न उपस्थित केल्यानंतरही तपासाला गती अन् घोटाळेबाजांना भिती नाही ?


🌟पुर्णा रेल्वे डिझेल चोरी प्रकरणावर सोईस्कररित्या पडदा टाकण्याचा प्रयत्न : वरिष्ठ अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात ?🌟 

🌟रेल्वे अधिकाऱ्यांकडून डिझेल डेपोतील डिझेल चोरी झालीच नसल्याचा बनाव ? सिबीआय चौकशीची होतेय मागणी🌟

परभणी/पुर्णा (परखड सत्य) :- मराठवाड्यातील सर्वात मोठे व महत्वाचे रेल्वे जंक्शन स्थानक म्हणून ओळख असलेल्या पुर्णा जंक्शन रेल्वे स्थानकावरील रेल्वेच्या 'डिझेल डेपोतून' सोईस्कर रित्या मोठ्या प्रमाणात डिझेलची चोरी होत असल्याचा गंभीर प्रकार परभणी जिल्हा पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हें शाखेच्या पथकाने दि.२९ जानेवारी २०२४ रोजी दैठणा पोलीस स्थानकाच्या हद्दीतील सिंगणापूर फाटा परिसरातून डिझेल टॅंकरसह डिझेलसाठा ताब्यात घेण्याची कारवाई केल्याने डेपोत कार्यरत रेल्वेच्या अधिकारी/कर्मचाऱ्यांचे पित्तळ उघडे पाडले या घटने संदर्भात रेल्वे सुरक्षा दलाच्या तपास अधिकाऱ्यांनी टँकर चालक संदिप पांढरे, कार्यालयीन अधिक्षक माधव पवार, इंडियन पेट्रोल पंप मॅनेजर रामचंद्र यादव,मुख्य कार्यालयीन अधिक्षक मोहम्मद इस्लाऊद्दीन उर्फ मोबीन,टँकर चालक नागनाथ शेंडे,कृष्णा देवांगण अश्या आठ लोकांवर कारवाई करीत जवळपास ४८ लाख रुपयांचा मुद्देमाल देखील ताब्यात घेतल्याचे रेल्वे सुरक्षा बलाच्या सुत्रांकडून समजते दरम्यान या घटने संदर्भात परभणी जिल्ह्याचे खासदार संजय जाधव यांनी दि.०८ फेब्रुवारी २०२४ रोजी लोकसभेत या डिझेल घोटाळ्या प्रकरणी शुन्य काळात प्रश्न उपस्थित करून पुर्णा जंक्शन रेल्वे स्थानकावरील रेल्वेच्या डिझेल डेपोला प्रतीरोज सप्लाई होणाऱ्या ८० हजार लिटर डिझेल साठ्यातून मोठ्या प्रमाणात डिझेल चोरी होत असल्याचे रेल्वे मंत्रालयाच्या निदर्शनास आणून दिले या संदर्भात रेल्वे मंत्रालय (रेल्वे बोर्डाचे) उप सचिव आशुतोष गर्ग यांनी दि.१५ फेब्रुवारी २०२४ रोजी रेल्वे सुरक्षा बलाचे महानिर्देशक, महानिरीक्षक मुख्यालय यांना चौकशी आदेश पारित करुन तीस दिवसांच्या आत जवाब देण्याची अपेक्षा व्यक्त केली.

परभणीचे खासदार जाधव यांनी लोकसभेत प्रश्न उपस्थित करुन कारवाईची मागणी केल्यानंतर तरी रेल्वे डिझेल चोरी प्रकरणाच्या तपासाला गती अन् घोटाळेबाजांच्या गोटात भिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात होती परंतु निर्ढावलेल्या घोटाळेबाजांनी लक्ष्मीअस्त्राचा वापर करीत या प्रकरणाला कलाटणी देण्याचेच गंभीर प्रकार चालवल्याचे निदर्शनास येत असून या घटनेतील तपासाचा आढावा घेण्यासाठी दि.१८ फेब्रुवारी २०२४ रोजी रेल्वे सुरक्षा बलाच्या पोलीस महानिरीक्षक आरोमासिंह ठाकूर यांनी पुर्णा जंक्शन स्थानक परिसरातील डिझेल डेपोला भेट दिली कारवाई संदर्भात पत्रकारांशी संवाद साधला घटनेतील आरोपींवर कठोर कारवाईसह त्यांच्या संपत्तीच्या संदर्भात तसेच प्रकरणं सीबीआयकडे वर्ग करण्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नांना देखील उडती उत्तर दिल्याने त्याच दिवशी सदरील प्रकरणाचा तपास सखोलपणे करण्याऐवजी व गुन्ह्याची व्याप्ती किरकोळ दाखवल्या जाऊन दि.२९ जानेवारी २०२४ रोजीच्या डिझेल चोरी घटने पुरताच होईल असे सिद्ध झाले होते.

याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे पुर्णा जंक्शन स्थानकावरील रेल्वे डिझेल डेपोतील चोरी प्रकरणात दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभागातील विभागीय व्यवस्थापक यांच्याकडून या डिझेल चोरी प्रकरणी खुलासा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती परंतु विभागीय व्यवस्थापक कार्यालयाकडून कुठल्याही प्रकारचा खुलासा करण्याचे का टाळण्यात आले असावे ? असा प्रश्न उपस्थित होत असतांनाच दि.२६ फेब्रुवारी २०२४ रोजी रेल्वे स्थानक परिसरातील रेल्वे कम्युनिटी हॉलच्या मागील भागातील स्टोअररुम म्हणून वापर होत असलेल्या जुन्या रेल्वे गार्ड/टिसी रनिंगरुमला आग लागून कागदपत्रे जळाल्याची घटना उघडकीस आली सदरील स्टोअररुमला आग लागली की जाणीवपूर्वक लावण्यात आली या प्रश्नाचे उत्तर अद्यापही गुलदस्त्यात असून या स्टोअररुममध्ये रेल्वे डिझेल डेपो संबंधातील कागदपत्रे तर नव्हती ना ? असा प्रश्न उपस्थित होऊन पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानेच या स्टोअररुमला आग लावण्यात आली असावी अशी चर्चा सर्वत्र होतांना दिसत असून या डिझेल घोटाळ्याची साखळी फार मोठी असल्यानेच रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी डिझेल चोरी झालीच नसल्याचा बनाव निर्माण करीत असून तसे लेखी पत्र देखील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दि.०७ मार्च २०२४ रोजी जारी केले असल्याचे समोर आले असून या कोट्यावधी रुपयांच्या रेल्वे डिझेल घोटाळ्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पांघरूण घालण्याचा गंभीर प्रकार होत असल्यामुळे सदरील प्रकरण सीबीआय/प्रवर्तन निर्दशालयाकडे वर्ग करुन सदरील प्रकरणातील आरोपींसह त्यांच्या गुन्ह्यांवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या देखील संपत्तीची चौकशी करण्याची मागणी पुढे येत आहे......

*********************************************

नोट : बातमीची कॉफी करु नयें

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या