🌟परभणी जिल्ह्यातील निवृत्तीवेतन धारकांनी माहिती सादर करण्याचे आवाहन.....!


🌟असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी श्रीमती सुनिता सुंकवाड यांनी केले🌟

परभणी (दि. 30 मार्च) : जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय निवृत्तीवेतन धारक, कुटुंब निवृत्ती वेतन धारकांनी त्याचे मूळ बँक खाते ज्याठिकाणी असेल ते सुरु ठेवण्याचे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी श्रीमती सुनिता सुंकवाड यांनी केले आहे. 

माहे मार्च 2024 पासून निवृत्तीवेतन, कुटुंब निवृत्तीवेतन यांचे मासिक निवृत्तीवेतन, ई-कुबेर प्रणाली मार्फत भारतीय रिझर्व बँकेतून थेट निवृत्ती वेतन धारकांच्या खात्यात जमा होणार असल्याने ज्या निवृत्तीवेतन धारकांनी कोषागार कार्यालयास न कळवता परस्पर बँक खाते बदल केले असतील किंवा इतर जिल्ह्यातील बँकेत खाते वर्ग केले असतील अशा निवृत्तीवेतन धारकांचे बँक खात्याचे  आयएफएससी कोड बदलामुळे निवृत्तीवेतन जमा होण्यास अडचणी निर्माण होईल. तसेच जिल्हा कोषागार कार्यालय, परभणी येथून निवृत्तीवेतन घेणाऱ्या सर्व निवृत्तीवेतन धारकांनी जिल्ह्यातील बँकेमधूनच निवृत्तीवेतन घ्यावे. ज्यांनी आपले बँक खाते कोषागार कार्यालयाच्या परवानगी शिवाय परस्पर बदलले असतील त्यांनी आपले बदल झाल्याचा तपशील कोषगारास तात्काळ कळविण्यात यावा अन्यथा त्यांचे मार्च 2024 चे मासिक निवृत्तीवेतन योग्य दुरुस्ती नंतर अदा करण्यात येईल यांची सर्व निवृत्तीवेतन धारकांनी नोंद घ्यावी असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी श्रीमती सुनिता सुंकवाड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे......

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या