🌟परभणी जिल्ह्यातील मातंग समाजाच्या विद्यार्थ्यांकडून प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याचे आवाहन....!


🌟मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील विद्यार्थ्यांनी रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रशिक्षण🌟

परभणी (दि.04 मार्च):  साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या) कार्यालयास मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील विद्यार्थ्यांनी रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी त्यांच्याकडून 28 मार्चपर्यंत अर्ज आमंत्रित करण्यात आले आहेत.  

या समाजातील कुटुंबाच्या सामाजिक, आर्थिक उन्नतीसाठी रोजगार व स्वंयरोजगाराची साधने उपलब्ध व्हावीत याकरिता सन 2024-25 या आर्थिक वर्षा करिता 500 चे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मातंग समाज बांधव व तत्सम बारा पोटजाती मधील इच्छुक पात्र विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. यासाठी  प्रशिक्षणार्थी  मातंग समाजातील व तत्सम बारा पोटजातीतील असावा व त्याचे वय 18 ते 50 वर्ष असावे. यापूर्वी महामंडळाच्या कोणत्याही प्रशिक्षण योजनेचा लाभ घेतलेला नसावा, प्रशिक्षणार्थीने आधार कार्ड जोडलेल्या बँक खात्याचा तपशिल सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्हा कार्यालय परभणी येथील सुचना फलकावर ट्रेंड निहाय यादी लावण्यात आली असून प्रशिक्षण विद्या वेतनासाठी विहीत नमुन्यातील अर्ज कार्यालयातून विनामूल्य उपलब्ध आहे. अशा पात्र विद्यार्थ्यांनी जातीचा दाखला, शैक्षणिक दाखला टि. सी., आधार कार्ड/मतदान कार्ड, राशन कार्ड, पासपोर्ट साईज फोटो दोन, उत्पन्नाचा दाखला इत्यादी कागदपत्रासह दि. 6 ते  28 मार्च, 2024 या कालावधीत विहीत नमुन्यातील अर्जासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जायकवाडी वसाहत कारेगाव रोड येथे अर्ज करावा तसेच  दि. 28 मार्च, 2024  नंतर कोणतेही प्रशिक्षणाचे अर्ज स्विकारले जाणार नसल्याचे जिल्हा व्यवस्थापक आर. एन. पवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या