🌟राष्ट्रीय सेवा योजनेच्या युवती कार्यशाळेतून सुप्त कलागुणांना चालना मिळते.....!

 🌟प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव यांचे प्रतिपादन🌟 

 राष्ट्रीय सेवा योजना महाविद्यालयीन युवक युवतीं साठीचा ऊर्जा स्त्रोत होय. युवाशक्तीला आपल्यातील सुप्त कलागुणांना चालना देणारी ही एक अभ्यास शाळा आहे.विद्यापीठ स्तरीय रासेयो युवती कार्यशाळेत ज्ञानासह मनोरंजन घडते,विद्यापीठ परिक्षेत्रातील युवाशक्तीला एकसंघ पणा बरोबरच आपल्या परिवारासह परिसराची ओळख करुन देण्याची एक नामी संधीच असते.या सुवर्णसंधीचा लाभ घेत युवतींनी चांगूलपणाची आदर्श रीत निर्माण केल्याचा आम्हास सार्थ अभिमान वाटतो असे मत समारोप प्रसंगी प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव यांनी अध्यक्षीय समारोपात व्यक्त केले.

         स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड कै.सौ.कमलताई जामकर महिला महाविद्यालय ,परभणी राष्ट्रीय सेवा योजना विभाग आयोजित विद्यापीठ स्तरीय रासेयो युवतीं कार्यशाळा समारोप प्रसंगी प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव बोलत होते.प्रमुख अतिथी प्राचार्य डॉ. वसंतराव भोसले सिनेट सदस्य, स्वारातीम विद्यापीठ,नांदेड. इंजि.नारायणराव चौधरी,सदस्य, व्यवस्थापन परिषद स्वारातीम विद्यापीठ नांदेड.शितलताई सोनटक्के सिनेट सदस्य, स्वारातीम विद्यापीठ,नांदेड.प्रा.डॉ.

अंबादासराव कदम, सदस्य,विद्यापरिषद स्वारातीम विद्यापीठ,नांदेड.या मान्यवरांची उपस्थिती होती.व्यासपीठावर रासेयो परभणी जिल्हा समन्वयक प्रा अरुण पडघन, उपप्राचार्य डॉ संगीता अवचार आदींची उपस्थिती होती स्वामी रामानंद तीर्थ,कै.सौ.कमलताई जामकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.प्रसंगी इतनी शक्ती हमे देना दाता हे प्रेरणा गीत निकिता जगताप हिने गायले कार्यशाळेविषयी चंचल कांबळे हिंगोली, कोमल गोगुरवार, नांदेड.फावडे राजकन्या, लातूर. भाग्यश्री बोरकडे ,परभणी. असे जिल्हा निहाय प्रतिनिधी म्हणून यांनी मनोगत व्यक्त केले.

      आमच्या महाविद्यालयात विद्यापीठाच्या वतीने रासेयो युवती कार्यशाळेचे आयोजन करण्याची संधी लाभली ,यथायोग्य नियोजन करत ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी रासेयो युवतींसह इतर  प्राध्यापक,कर्मचाऱ्यांचे विशेष योगदान राहिले आहे.या कार्यशाळेत विद्यापीठ परिक्षेत्रातील महाविद्यालयां मधून आलेल्या रासेयो युवती सुज्ञ,सुजाण,हरहुन्नरी ,सभ्य,अभ्यासू होत्या ही विशेष बाब आमच्या लक्षात आली या सर्व युवतींचे आमचे व्यवस्थापन मंडळ  आणि प्राचार्य या नात्याने मी मनापासून अभिनंदन करत उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देतो असे मत प्राचार्य डॉ.वसंतराव भोसले यांनी व्यक्त केले.

        सदरील कार्यशाळेतून मिळालेली ज्ञानानुभवाची शिदोरी सोबत घेत तुम्ही युवतींनी जनजागर करण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा.पुरुषांच्या बरोबरीनेच नव्हे तर काकणभर सरस समाजकार्य आपल्या हातून घडेल असा विश्वास इंजि.नारायणराव चौधरी यांनी व्यक्त केला राष्ट्रीय सेवा योजना अशा कार्यशाळा आणि शिबीरां मधून युथ मधे सेवाभाव रुजविण्याचे कार्य करत विविध कौशल्यांचा विकास साधते.माहिती तंत्रज्ञानामुळे आज जग मुठीत सामावले आहे.या ज्ञानाधारे युवतींनी समाजातील सभ्यता वाढीस लावण्यासाठी प्रयत्नशील राहावे असा आशावाद प्रा.डॉ.अंबादास कदम यांनी व्यक्त केला.

         महिला म्हणून आपले अस्तित्व सिद्ध करताना, सकारात्मक बदल करणारे आपण विशेष आहोत ही जाणीव ठेवून समाज परिवर्तनासाठी युवतींनी योगदान द्यावे.आपली स्पेशालिटी ज्ञान,शक्ती,युक्ती च्या सहाय्याने जगाला दाखवून द्यावी असे आवाहन शितल सोनटक्के यांनी केले. या कार्यशाळेत सहभागी स्वयंसेविकांना मान्यवरांचे हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार, अहवाल वाचन रासेयो कार्यक्रम अधिकारी तथा जिल्हा समन्वयक प्रा.अरुण पडघन यांनी केले.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या