🌟'माविम' आयोजित नवतेजस्विनी तालुकास्तरीय प्रदर्शनात महिलांची लाखोची उलाढाल.....!


🌟यापुढे ही भविष्यात उद्योग व्यवसायात जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावे - बाळासाहेब झिंजाडे

🌟नवतेजस्विनी तालुकास्तरीय प्रदर्शनामध्ये महिलांचा उत्स्फूर्त सहभाग🌟

परभणी (दि.०१ मार्च): माविम' आयोजित नवतेजस्विनी तालुकास्तरीय प्रदर्शनात महिलांची लाखोची उलाढाल  झाली असून, यापुढे ही भविष्यात उद्योग व्यवसायात जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महिला आर्थिक महामंडळाते जिल्हा समन्वय अधिकारी बाळासाहेब झिंजाडे यांनी केले. ते 'माविम'च्या चार दिवशीय विक्री प्रदर्शनाच्या समारोपीय कार्यक्रमामध्ये बोलत होते. 

जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक सुरेश पवार, जिल्हा व महिला बालविकास विभागाच्या श्रीमती मंनतकर, कृषि विज्ञान केंद्राचे  डॉ. इम्रान खान, डॉ. वर्षा काळे तसेच सर्व सीएमआरसी अध्यक्ष उपस्थित होते.महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान, नव तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प अंतर्गत 8 लोकसंचलित संधन केंद्रामार्फत स्वयं सहय्यता महिला बचत गटाने तयार केलेल्या वस्तू व मालाच्या विक्री प्रदर्शनाचे २७ फेब्रुवारी ते दि. १ मार्च २०२४ या कालावधीत सिटी क्लब येथे आयोजन करण्यात आले होते. 

 सकाळी महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम व दुपारी प्रमाणपत्र वाटप व विविध स्पर्धांचे बक्षीस वाटप करण्यात आले. प्रदर्शनादरम्यान  एकूण २७५ उद्योजक महिलांनी सहभाग नोंदविला असून त्यांची चार दिवसात लाखो रुपयांची उलाढाल झाली. त्यामुळे उद्योजक महिलांनी समाधान व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा समन्वय अधिकारी बाळासाहेब झिंजाडे यांनी केले तर सूत्र संचालन जयश्री टेहरे व अभिमन्यू भोसले यांनी केले तर आभार  गंगासागर भराड यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवराज राउत,मीनाक्षी पुरी, विनय कुंभार सर्व व्यवस्थापक, लेखापाल, सहयोगीनी, सीआरपी यांनी परिश्रम घेतले.....


*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या