🌟सोनार समाजसेवक डॉ.गजानन पी रत्नपारखी यांना अमेरिकेची आंतरराष्ट्रीय फेलोशिप.....!


🌟डॉ.गजानन पी रत्नपारखी २४ हजारांहून अधिक हृदयरोग रुग्णांवर हृदयरोग शस्त्रक्रिया करण्यात यशस्वी🌟

🌟अमेरिकेच्या सोसायटी फॉर कार्डिओ-व्हॅस्कुलर अँजिओग्राफी अँड इंटरव्हेन्शन ह्या संस्थेकडून सन्मान🌟 

नाशिक (दि.०३ मार्च) - मुंबई येथील सोनार समाजसेवक तसेच सुप्रसिद्ध हृद्रोगतज्ज्ञ डॉ गजानन पी रत्नपारखी यांना अमेरिका येथील सोसायटी फॉर कार्डिओ-व्हॅस्कुलर अँजिओग्राफी अँड इंटरव्हेन्शन (SCAI) नामक जगप्रसिद्ध संस्थेतर्फे हृद्रोग आणि संबंधित विविध शस्त्रक्रिया विषयांमध्ये उत्तुंग कार्य केल्याबद्दल दिनांक २५ फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय फेलोशिप प्रदान करण्यात आली डॉ. रत्नपारखी यांनी २४००० पेक्षा अधिक हृद्रोग शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत. या यशाबद्दल डॉ. गजानन पी रत्नपारखी यांचे सकल भारतीय सोनार समाज संघटन आणि सेतुबंधन मधील विविध सोनार समाज संस्था आणि संघटना यांच्यातर्फे  तसेच समाजाच्या विविध स्तरातून विशेष अभिनंदन होत आहे अशी माहिती सकल भारतीय सोनार समाज संघटनचे संस्थापक श्री मिलिंदकुमार सोनार,युनिव्हर्सल विश्वकर्मा फाउंडेशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री शांताराम दुसाने यांनी दिली.

अमेरिकेच्या सोसायटी फॉर कार्डिओ-व्हॅस्कुलर अँजिओग्राफी अँड इंटरव्हेन्शन (SCAI) ह्या संस्थेकडून सन्मान मिळवणारे डॉ गजानन रत्नपारखी हे MBBS, MD, DM, FESC, FCSI, FSCAI उच्चशिक्षित हृद्रोगतज्ज्ञ असून,  मुंबईतील प्रथम आयएसओ प्रमाणित इन्स्टिट्यूट  असण्याचा सन्मानदेखील डॉ गजानन रत्नपारखी यांच्याच नावे आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या