🌟पुर्णा तालुक्यात अवैध गौण खनिज वाळू तस्करी विरोधात महसूल प्रशासनाची धडक कारवाई मोहीम....!


🌟नायब तहसीलदार प्रशांत थारकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाच्या धाडसी कारवायांनी अवैध वाळू तस्करांमध्ये घबराट🌟 


पुर्णा (दि.०१ मार्च) - पुर्णा/गोदावरी नदीपात्रांना आपली खाजगी मालमत्ता असल्यागत अक्षरशः जेसीबी यंत्र तसेच सेक्शन पंपांसह परराज्यातील गोताखोर कामगारांच्या साहाय्याने प्रचंड प्रमाणात शासकीय गौण खनिज वाळूचे बेकायदेशीररीत्या उत्खनन करीत पुर्णा/गोदावरी नदीपात्रांवर अधिराज्य गाजवणाऱ्या अवैध वाळू माफियांच्या विरोधात महसूल प्रशासनातील अधिकारी नायब तहसीलदार प्रशांत थारकर यांनी धडाकेबाज कारवायांना सुरुवात केल्याने अवैध वाळू तस्करीतून मिळणाऱ्या प्रचंड पैश्यामुळे मुजोर झालेल्या अवैध वाळू तस्कर माफियांमध्ये अक्षरशः घबराट निर्माण झाली आहे.


पुर्णेतील महसूल प्रशासनात कार्यरत होताच नायब तहसीलदार प्रशांत थारकर यांनी तालुक्यातील अवैध गौण खनिज वाळू तस्करी विरोधात धडक कारवायांना सुरुवात केली मागील फेब्रुवारी महिन्यात त्यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तहसिलदार माधवराव बोथीकर यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध वाळू तस्करी करणारी तब्बल ०९ वाहन ताब्यात घेऊन त्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करुन लाखों रुपयांचा महसूल वसूल करण्यात आला होता नायब तहसीलदार थारकर यांच्या नेतृत्वाखालील महसूल प्रशासनाचे पथक कमालीचे सतर्क झाले असून आज शुक्रवार दि.०१ मार्च २०२४ रोजी नायब तहसीलदार प्रशांत थारकर व पथकातील सहकारी साईनाथ दाढे,गणेश गोरे,शेलाते,रामेश्वर केंद्रे यांनी तालुक्यातील कौडगाव/कान्हेगाव शिवारातील पुर्णा नदीपात्रातून ट्रॅक्टरसह एक केनी ताब्यात घेण्याची तर ०४ वाळू उपसण्यासाठी वापरल्या जाणारे तराफे तर कान्हेगावात ०१ तराफा जाळण्याची धाडसी कारवाई केली यावेळी पथकाने घटने संदर्भात पुर्णेचे कर्तव्यदक्ष उपविभागीय पोलीस अधिकारी समाधान पाटील व पुर्णा पोलिस स्थानकाचे पोलीस निरीक्षक विलास गोबाळे यांना माहिती देताच दोन्ही अधिकारी महसूल प्रशासनाच्या पथकाच्या मदतीला पोलीस बंदोबस्तासह धावले दरम्यान नायब तहसीलदार प्रशांत थारकर यांच्या नेतृत्वाखालील पथकासह कर्तव्यदक्ष उपविभागीय पोलीस अधिकारी समाधान पाटील यांच्या धाडसी कारवायांनी अवैध वाळू तस्करांमध्ये अक्षरशः घबराट निर्माण झाल्याचे निदर्शनास येत आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या