🌟पुर्णा तालुक्यातील माखणी येथील ग्रामपंचायत कार्यालयात जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा....!


🌟या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माखणी ग्रामपंचायतचे सरपंच गोविंद आवरगंड हे होते🌟                  

पुर्णा : पुर्णा तालुक्यातील माखणी येथील ग्रामपंचायत कार्यालयात आज दि.०८ मार्च रोजी जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.      

पुर्णा तालुक्यातील ताडकळस येथून जवळच असलेल्या मोजे माखणी येथे ग्रामपंचायत कार्यालय यांच्यावतीने महिला दिन मोठा. साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माखणीचे सरपंच गोविंद आवरगंड हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सोसायटीचे चेअरमन बाबुराव आवरगंड तर ग्रामसेवक कांबळे प्रगतशील शेतकरी तथा.अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुकाप्रमुख जनार्धन आवरगंड यांनी आपले मनोगत व्यक्त केले .कार्यक्रमात.प्रथमता सावित्रीबाई फुले जिजाऊ मासाहेब अहिल्याबाई होळकर इंदिरा गांधी  रमाबाई आंबेडकर आधीच्या प्रतिमेचे पूजन केले व आलेल्या महिलाचा ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला .या कार्यक्रमांमध्ये महिलांची उपस्थिती संताबाई सोळंके गंगा ताई आवरगंड उज्वला आवरगंड .भागीरथीबाई पोळ लक्ष्मीबाई अंभोरे पदमीनबाई आवरगंड नंदाबाई आवरगंड अंतिकाबाई आवरगंड आदी महिलांची उपस्थिती होती हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुंजाजी आवरगंड देविदास पलमपल्ली संतोष आंबोरे आदींनी परिश्रम घेतले तर  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ग्रामसेवक कांबळे यांनी केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या