🌟त्याबद्दल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी त्यांचे अभिनंदन केले🌟
परभणी : परभणी जिल्ह्यातल्या पुर्णा तालुक्यातील धनगर टाकळी येथील गंगा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य रामकिशन दत्तराव रौंदळे यांची हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील पुर्णा सहकारी साखर कारखान्यावर शासन नामनिर्देशित संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून रामकिशन रौंदळे हे कार्यरत असून तत्पूर्वी भाजप ओबीसी मोर्चा महाराष्ट्र चिटणीस पदाची जबाबदारी देखील त्यांनी सांभाळलेली आहे. आता पूर्णा साखर कारखान्यावर शासन नामनिर्देशित संचालक म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे. त्याबद्दल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी त्यांचे अभिनंदन केले.
पुर्णा सहकारी साखर कारखाना लि. वसमतनगर या कारखान्यावर श्री. रामकिशन दत्तराव रौंदळे यांची शासन नामनिर्देशित संचालक म्हणून नियुक्ती करण्याबाबत महाराष्ट्र शासनाचे उप सचिव अंकुश शिंगाडे 26 फेब्रुवारी रोजी साखर आयुक्त, साखर संकुल, शिवाजी नगर, महाराष्ट्र राज्य, पुणे-411005 यांना पत्राद्वारे कळविले होते. पत्रात नमूद केले की, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 73 अ मधील तरतुदीनुसार पुर्णा सहकारी साखर कारखाना लि. वसमतनगर या कारखान्यावर रामकिशन दत्तराव रौंदळे यांची शासन नामनिर्देशित संचालक म्हणून नियुक्ती करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. तरी आपण नियुक्तीचे सविस्तर आदेश आपल्या स्तरावरून निर्गमित करण्यात यावेत व त्याबाबतचा अनुपालन अहवाल शासनास सादर करावा. त्यानुसार रौंदळे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
या नियुक्तीबद्दल पक्षाचे जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे, महानगराध्यक्ष राजेश देशमुख, आमदार मेघनाताई बोर्डीकर, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार बाबाजानी दुर्राणी, लोकसभा समन्वयक डॉ. सुभाष कदम, सह समन्वयक डॉ. केदार खटिंग, सुरेश जाधव, प्रवीण देशमुख, प्रमोद वाकोडकर, आनंद भरोसे, शिवाजीराव मोहाळे, सुभाष आंबट आदींनी रौदळे यांचे अभिनंदन केले आहे......
0 टिप्पण्या