🌟परभणी जिल्ह्यात अनुज्ञप्ती चाचणी व योग्यता प्रमाणपत्र नूतणीकरण तपासणी सकाळी 8 वाजता सुरु......!


🌟यासाठी दि.6 मार्च पासून असोला येथील पक्की अनुज्ञप्ती चाचणी, योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण तपासणी होणार🌟

परभणी (दि.04 मार्च) :  जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढल्याने मौजे असोला येथील पक्की अनुज्ञप्ती चाचणी व योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणासाठी येणाऱ्या अर्जदार व वाहन चालक-मालकांस उन्हाचा त्रास होऊ नये, यासाठी बुधवार, (दि.6) पासून असोला येथील पक्की अनुज्ञप्ती चाचणी, योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण तपासणी सकाळी 8 ते दुपारी 12 पर्यंत करण्यात आली आहे. तरी  जिल्ह्यातील पूर्व अपॉईंटमेंट घेतलेल्या सर्व अर्जदारांनी याची नोंद घेऊन त्यांना देण्यात आलेल्या अपॉईंटमेंटच्या दिवशी सकाळी 8 वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अश्विनी स्वामी यांनी केले आहे.

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या