🌟औंढा नागनाथ येथे 500 केशर आंब्यांने नागनाथाची आरास हर हर महादेवच्या जयघोषणात भाविकांनी घेतले नागनाथचे दर्शन....!


🌟शेतकरी अनिल देशमुख यांनी आंबे उपलब्ध करून दिले🌟

✍🏻 शिवशंकर निरगुडे : हिंगोली

देशातील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औढा नागनाथ येथे महाशिवरात्री निमित्त शुक्रवारी ता. 8 सुमारे 500 आंब्याने नागनाथाची आरास करण्यात आली. पहाटे दिड वाजेपर्यंत महापूजा संपल्यानंतर दोन वाजता मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. सकाळी 9 वाजे.पर्यंत सुमारे 40 हजार भाविक दर्शन रांगेत होते. हर हर महादेव, बम बम भोले च्या गजराने मंदिर परिसर दणाणून गेला होता.


औंढा नागनाथ येथे महाशिवरात्री निमित्त मध्यरात्री केसर आंब्यांची आरास करण्यात आली. शेतकरी अनिल देशमुख यांनी आंबे उपलब्ध करून दिले. त्यानंतर साडेबारा वाजल्या पासून महापूजेला सुरवात.करण्यात आले. संस्थानचे पदसिध्द सल्लागार आमदार.संतोष बांगर, अध्यक्ष तथा तहसीलदार हरिश गाडे, मुख्य पुजारी तुळजादास भोपी यांच्या हस्ते महापूजा.करण्यात आली. पहाटे दिड वाजेपर्यंत पुजा झाली..त्यानंतर दोन वाजता मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात.आले. भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

हर हर महादेव, बम बम भोलेचा भाविकांकडून.गजर केला जात होता. साधे दर्शन व विशेष पास.दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. पहाटे पासूनच भाविक मिळेल त्या वाहनाने औढा नागनाथ येथे नागनाथाच्या दर्शनासाठी येत होते.  आज सकाळ पासून लाखो भाविकांनी दर्शन घेतले.भाविकांच्या सोयीसाठी बॅरीकेटस लावण्यात आले..तसेच ऑनलाईन दर्शनासाठी तीन स्क्रिन देखील लावण्यात आल्या आहेत. भाविकांना पाच क्विंटल साबुदाना खिचडीचा महाप्रसाद वाटप करण्यात आला . नागनाथ मंदिराचा परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला आहे.

नागनाथ मंदिराच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरेबसविण्यात आले. या शिवाय साध्या वेशातील पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून स्थानिक गुन्हे शाखा व स्थानिक औंढा पोलिसांचे पथक तैनात केले आहे. भाविकांच्या.वाहतुकीसाठी विशेष बसगाड्या.देखील सोडण्यात आल्या आहेत. या शिवाय खाजगी.वाहनाने भाविक दर्शनासाठी येत आहेत. पोलिस अधिक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, पोलिस निरीक्षक विकास पाटील यांनी औंढा नागनाथ येथे भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली.

*सोमवारी रथोत्सवाचा कार्यक्रम*

महाशिवरात्री यात्रेचे रथोत्सव मुख्य आकर्षण आहे. सोमवारी ता. 11 रात्री दहा वाजता रथोत्सवाचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी नागनाथ मंदिराला पाच प्रदक्षिणा घेतल्या जाणार आहे. यावेळी सुमारे 70 हजार पेक्षा अधिक भाविक उपस्थित राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या