🌟राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत 5 लाखावर बनावट, विदेशी मद्यसाठा जप्त....!


🌟लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिघे ताब्यात; मुख्य आरोपीचा शोध सुरु🌟

परभणी (दि.07 मार्च) : राज्य उत्पादन शुल्क मुंबई, संचालक अंमलबजावणी व दक्षता पथक मुंबई यांचे निर्देशाप्रमाणे तसेच विभागीय उप-आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, नांदेड व अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, परभणी यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर केलेल्या कारवाईत ५ लाख २७ हजार रुपये किमतीचा विदेशी बनावट मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे.


जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या परभणी व हिंगोलीच्या भरारी पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीवरून ही कारवाई केली. परभणी तालुक्यातील परभणी ते उमरी रोडवर उजळांबा शिवार येथून वाहनाने अवैधरीत्या गोवा राज्यात विक्रीस असलेले विदेशी तसेच बनावट विदेशी मद्यसाठ्याची वाहतूक होणार असल्याच्या माहितीवरून परभणी ते उमरी रोडच्या बाजूस दुपारी सापळा रचला असता परभणी ते उमरी रोडने एक संशयीत चारचाकी वाहन क्र. एमएच 24 सी 4009 येत असताना दिसले. या वाहनास थांबवून वाहनाची झडती घेतली असता वाहनामध्ये आरोपी गोविंदा नारायण अल्लाडीवार वय-32 वर्ष रा. जातामखोरा ता. सावनेर जि. नागपूर ह.मु.कड्बी मंडी, परभणी,  सय्यद माजीद सय्यद रफिक वय-33 वर्ष, रा.साखला प्लॉट, लोहगाव रोड, परभणी यांच्या ताब्यातून तेरा (13) पृष्ठी खोक्यात देशी दारू भिंगरी संत्रा 180 मी.ली. क्षमतेच्या एकूण 648 सीलबंद बाटल्या ज्यात एकूण 116.64 बल्क लिटर देशी दारू ज्याची एकूण अंदाजे किंमत रु. 45 हजार 360 गोवा राज्यात विक्री असलेले विदेशी मद्य ज्यावर महाराष्ट्र राज्यात विक्रीस असलेले विदेशी मद्याचे बनावट कागदी लेबल लावलेले विदेशी मद्य मॅकडॉल नं.1 व्हिस्की व रॉयल चालेंज व्हिस्की 180 मी.ली.क्षमतेच्या एकूण अनुक्रमे 53 व 13 सीलबंद बाटल्या ज्याची एकूण अंदाजे किंमत 10 हजार 290 तसेच इतर असा एकूण 2 लाख 25 हजार 650 रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या गुन्ह्यातील ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे  बनावट विदेशी दारू व परराज्यातील विदेशी दारू मुद्देमालाबाबत चौकशी केली असता त्यांनी सदरील मद्यसाठा तुकाराम माणिकराव गिराम याचे बोरवंड (खु) शिवारातील राहते घरून मद्यसाठा घेतल्याचे कळविल्याने राज्य उत्पादन शुल्क, विभागाने तात्काळ माहिती प्रमाणे आरोपी तुकाराम माणिकराव गिराम वय-28 वर्ष रा. बोरवंड (खु) याचे घरी छापा टाकला असता आरोपीच्या ताब्यात महाराष्ट्र राज्यात प्रतीबंधित असलेला फक्त गोवा राज्यात विक्री करीता असलेले विदेशी मद्याच्या 180 मी.ली. क्षमतेच्या 949 सीलबंद बाटल्या, विविध विदेशी ब्रँन्डचे बनावट मद्य, तसेच एकूण 1 हजार 260 बनावट कागदी लेबल व इतर असा एकूण 3 लाख 1 हजार 820 रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी क्र. 1 ते 3 यांना अटक करून ताब्यात घेण्यात आले व त्यांचे महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलम 65  (a) (b) (d) (e) (f) 80,81,83,90 व 108 अन्वये गुन्हा क्र. 89/2024 निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क,भरारी पथक,परभणी/हिंगोली कार्यालयात नोंद करण्यात आला आहे.                

दोन्ही घटनास्थळावून उपरोक्त प्रमाणे तीन आरोपीच्या ताब्यातून विविध विदेशी ब्रंन्डचे बनावट मद्य, परराज्यतील मद्य, बनावट लेबल, चारचाकी वाहन व इतर असा एकूण 5 लाख 27 हजार 470 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त  करण्यात आला आहे. तसेच सदर गुन्ह्यातील मद्यपुरवठा करणारा मुख्य सूत्रधार आंबेजोगाई जिल्हा बीडचा महादेव (आण्णा) बालासाहेब दारमुडे याचा तपास चालू आहे उपरोक्त प्रमाणे तिन्ही आरोपीनां मा.न्यायालय, परभणी यांचे समक्ष हजर केले असता दि.7 मार्च पर्यंत पोलीस कोठडी मंजूर झालेली आहे. या कार्यवाहीत परभणी विभागातील निरीक्षक ए.एम.पठाण, सु.अ.चव्हाण, तसेच दुय्यम निरीक्षक ए.बी.जाधव, ए.बी.केंद्रे, एस.आर.आल्हाट, एच.एम.पाकलवाड आणि जवान आर.ए.चौहान, एस.एस.मोगले व बी.पी .कच्छवे जवान-नि-वाहन चालक राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक परभणी/हिंगोली यांनी केलेली आहे. पुढील तपास निरीक्षक ए.एम.पठाण हे करीत आहेत......           

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या