🌟हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे सोम्य धक्के 4.5 रिश्टर स्केलवर नोंद....!


🌟या भूकंपामुळे नुकसान झाल्यास त्याची माहिती तात्काळ प्रशासनाला देण्याच्या कर्मचाऱ्यांना सुचना🌟


✍🏻शिवशंकर निरगुडे : हिंगोली 

मराठवाड्यातील अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले असून नागरिकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे नांदेड,परभणी, हिंगोलीमध्ये 4.5 रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. सकाळी 6 वाजून 8 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले असल्याची माहिती मिळत आहे हिंगोली जिल्हयातील सर्वच गावांमधून गुरुवारी ता. 21 पहाटे 6 वाजून 8 मिनिटांनी भूकंपचा मोठा धक्का बसला आहे. 4.5 रिश्टर स्केलची नोंद झाली तर त्यानंतर काही वेळातच झालेल्या दुसऱ्या धक्कयाची 3.6 एवढी नोंद झाली असल्याचे आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या सुत्रांनी सांगितले. या भूकंपामुळे नुकसान झाल्यास त्याची माहिती तातडीने प्रशासनाला देण्याच्या सुचनाही गावपातळीवरील कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.


हिंगोली जिल्हयात मागील तीन ते चार वर्षापासून जमीन हादरण्याचे प्रकार वाढले आहेत. जमीनीतून आवाज येऊन जमीन हादरत असून वारंवार होणाऱ्या या घटना आता गावकऱ्यांच्याही अंगवळणी पडल्या आहेत. विशेषतः औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी, राजदरी, सोनवाडी, काकडदाभा, फुलदाभा या गावांसह वसमत तालुक्यातील वापटी, कुपटी, पांगरा शिंदे, वाई तर कळमनुरी तालुक्यातील सिंदगी, बोल्डा, पोतरा, नांदापूर या भागात जमीन हादरण्याचे प्रकार नित्याचेच झाले आहेत.

हिंगोली जिल्हयात मागील तीन ते चार वर्षापासून जमीन हादरण्याचे प्रकार वाढले आहेत. जमीनीतून आवाज येऊन जमीन हादरत असून वारंवार होणाऱ्या या घटना आता गावकऱ्यांच्याही अंगवळणी पडल्या आहेत. विशेषतः औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी, राजदरी, सोनवाडी, काकडदाभा, फुलदाभा या गावांसह वसमत तालुक्यातील वापटी, कुपटी, पांगरा शिंदे, वाई तर कळमनुरी तालुक्यातील सिंदगी, बोल्डा, पोतरा, नांदापूर या भागात जमीन हादरण्याचे प्रकार नित्याचेच झाले आहेत.

दरम्यान, आखाडा बाळापूर व परिसरात सकाळी 6 वाजून 8 मिनिटाचा मोठा धक्का तर त्यानंतर काही वेळातच सौम्य धक्का जाणवल्याचे गावकरी केशव मुळे यांनी सांगितले. तर पिंपळदरी परिसरातील आता पर्यंतचा सर्वात मोठा धक्का बसल्याचे गावकरी बापूराव घोंगडे यांनी सांगितले. प्रशासनाकडून 4.5 ची नोंद असल्याची माहिती जिल्हयात झालेल्या या भूकंपाची 4.5 रिश्टर स्केल एवढी नोंद असून त्याची खोली 10 किलोमिटर पर्यंत असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर दुसरा.धक्का 6 वाजून 10 मिनिटांनी बसला असून त्याची 3.6 रिश्टर स्केल नोंद झाल्याचे सांगण्यात आले आहे.

सर्वच गावांमधून नुकसानीची माहिती घेण्याच्या सुचना देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. नांदेड शहरात अनेक भागात गुरुवारी सकाळी 6 वाजून 9 मिनिटाच्या दरम्यान दहा सेकंद 4.2 रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू आखाडा.बाळापूर पासून 15 किलोमीटरवर दाखवला जात आहे. दरम्यान अनेक लोक रस्त्यावर घाबरून आले मार्चच्या पहिल्या आठवड्यात ही धक्के जाणवले होते.

* हिंगोलीतील रामेश्वर तांडा हे भुकंपाचे केंद्र :-

२१ मार्च रोजी सकाळी 06:08:30 वाजता 4.5 रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याची नोंद राष्ट्रीय भूकंप मापण यंत्रणेवर दिसुन आली. हिंगोली जिल्ह्य़ातील वसमत तालुक्यात असलेल्या कुरुंदा व दांडेगावच्या उत्तर भागातील रामेश्वर तांड्याच्या उत्तर भागात भूकंपाचे केंद्र असल्याचे दिसून आले. याची खोली 10 किलोमीटर असल्याचे दिसत आहे. लगेचच दुसरा हलका धक्का पहिल्या धक्क्यानंतर अकरा मिनिटांनी म्हणजे  सकाळी 06:19:05 वाजता 3.6 रिश्टर स्केल चा भूकंप झाल्याची नोंद राष्ट्रीय भूकंप मापण यंत्रणेवर दिसुन आली. मात्र या भूकंपाचे केंद्र तिन किलोमीटर दक्षिणेला असलेल्या कुरुंदा व दांडेगावच्या रामेश्वर तांड्याच्या दक्षिण भागात असल्याचे दिसून आले. याही भूकंपाची खोली 10 किलोमीटर असल्याचे दिसत आहे.

मराठवाड्यातील 1993 च्या भूकंपानंतरचा हा सर्वात मोठा आहे.  यावेळेस हिंगोली नांदेड परभणी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी या  भूकंपाचे धक्के बसल्याचे फोन आले श्रीनिवास औंधकर, संचालक, एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र,  छत्रपती संभाजीनगर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या