🌟परभणीतील अल्पसंख्यांक महारोजगार मेळाव्यात 211 जणांची निवड...!


🌟मेळाव्यात राज्यातील 11 नामांकीत मोठे उद्योजक कंपन्यांची उपस्थिती होती🌟

परभणी (दि.05 मार्च) :  जिल्ह्यातील अल्पसंख्यांक (मुस्लिम,बौध्द, जैन,ख्रिश्चन,पारशी) बेरोजगार उमेदवारांसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, दि मेमन मर्चट असोशिएशन, परभणी, हाजी अब्दूल रशिद चेरिटेबल ट्रस्ट व सेंटर फॉर एज्युकेशनल एक्सलन्स यांच्या संयुक्त विद्यमाने (दि. 3) रोजी पंडित दिनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्यात 211 बेरोजगार उमेदवारांची निवड करण्यात आली. पाडेला फंक्शन हॉल येथे या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. 

परभणी जिल्ह्यामध्ये मोठया प्रमाणात उद्योगधंदे उपलब्ध नसल्याने स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास विभागाकडून जिल्ह्यातील गरजू अल्पसंख्यांक बेरोजगारांना खाजगी क्षेत्रात नोकरीची एक संधी उपलब्ध व्हावी या हेतूने हा भव्य पंडित दिनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता मेळाव्यात राज्यातील 11 नामांकीत मोठे उद्योजक कंपन्यांची उपस्थिती होती. या ठिकाणी जिल्ह्यातील अल्पसंख्यांक उमेदवारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून उपस्थित एकूण 770 बेरोजगार उमेदवारांपैकी उद्योजक/ कंपन्या यांनी 211 उमेदवारांची नोकरीसाठी निवड झाली आहे.

तसेच जिल्हा उद्योग केंद्र, एस.बी.आय. आरसीटी, मौलाना आझाद अल्पसंख्याक विकास महामंडळ, महिला आर्थिक विकास महामंडळ, दिव्यांग वित व विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य जिवन्नोती अभियान यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून स्वयंरोजगार सुरु करण्यासाठी शासकीय योजनांची संपूर्ण माहिती दिली असल्याचे सहायक आयुक्त प्र.सो. खंदारे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.....

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या