🌟दयावान सरकार परभणी जिल्हा कार्याध्यक्ष प्रमोद अंभोरे यांना "राष्ट्रीय एकात्मता गौरव पुरस्कार 2024" जाहीर....!


🌟या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन मा.अजमत खान यांनी केले आहे🌟

परभणी (दि.०७ मोर्चा) - संपूर्ण महाराष्ट्र भर आपल्या निःस्वार्थ कार्याने परिचित असलेली "नो निषेध, नो निवेदन, फैसला ऑन द स्पॉट" "मागेल त्याला न्याय" या तत्वावर कार्य करणारी अगदी कमी वेळात आपल्या कार्य पद्धतीने समाजात आपली वेगळी छाप निर्माण करणारी विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्य विषयक, रोजगार विषयक उपक्रम राबवून गोर गरीब लोकांची मदत करणारी लोकप्रिय सामाजिक संघटना "दयावान सरकार महाराष्ट्र राज्य" या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.संदीपभाई निकुंभ, महिला अध्यक्षा मा. प्रियाताई वैद्य, मुख्य मार्गदर्शक मा.अरविंदभाई सपकाळे, महाराष्ट्र कार्याध्यक्ष मा. सिद्धार्थ भाई राक्षे, महाराष्ट्र सचिव नितीन भाई इंगोले, मराठवाडा अध्यक्ष मा. संजयभाई गायकवाड, कल्याण डोंबिवली अध्यक्ष मा. संदिपभाई पाईकराव, कल्याण डोंबिवली कार्याध्यक्ष ऍड. सुभाष भाई अंभोरे, परभणी जिल्हा अध्यक्ष मा. रघुवीरसिंग भाई टाक यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी जिल्ह्यात दयावान सरकार च्या अंतर्गत परभणी जिल्हा कार्याध्यक्ष मा. प्रमोद अशोकराव अंभोरे यांनी केलेल्या विविध सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य विषयक कार्य करून समाजसेवेचे कार्य केल्याच्या कार्याचा आढावा घेऊन येथील सहारा एज्युकेशन अँड वेलफेअर फाउंडेशन परभणी चा "राष्ट्रीय एकत्मता गौरव पुरस्कार 2024" हा पुरस्कार मा. प्रमोद अशोकराव अंभोरे यांना जाहीर झाला आहे. या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन मा.अजमत खान यांनी केले आहे. हा पुरस्कार सोहळा शहरातील श्री लक्ष्मी नारायण मंगल कार्यालय रेल्वे स्टेशन समोर परभणी दिनांक 8 मार्च 2024 रोजी सायंकाळी 4:30 मी. संपन्न होणार आहे. "राष्ट्रीय एकात्मता गौरव पुरस्कार 2024" हा पुरस्कार दयावान सरकार महाराष्ट्र राज्य परभणी जिल्हा कार्याध्यक्ष मा. प्रमोद अशोकराव अंभोरे यांना जाहीर झाल्या बद्दल त्यांच्यावर दयावान सरकार महाराष्ट्र राज्य सर्वच पदाधिकारी व सर्वच क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या