🌟लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने 96-परभणी विधानसभा मतदार संघातील नोडल अधिकाऱ्यांची बैठक संपन्न...!


🌟सहायक निवडणुक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी दत्तु शेवाळे यांचे अध्यक्षतेखाली बैठक संपन्न🌟

परभणी (दि.12 मार्च) : आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 चे अनुषंगाने 17-परभणी लोकसभा मतदार संघाअंतर्गत 96-परभणी विधानसभा मतदार संघातील नियुक्त सर्व नोडल अधिकारी व कर्मचारी यांची आढावा बैठक दि. 12 मार्च रोजी सांस्कृतीक सभागृह, शिवाजी महाविद्यालय, परभणी येथे सहायक निवडणुक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी दत्तु शेवाळे यांचे अध्यक्षतेखाली आयोजीत करण्यात आली होती.

यावेळी सर्व प्रशिक्षणार्थीना लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 चे अनुषंगाने नेमुन देण्यात आलेल्या कामकाजाबाबत यथोचीत प्रशिक्षण देवून निवडणूकीच्या कामकाजात कोणताही निष्काळजीपणा खपवुन घेतला जाणार नसल्याचे सांगण्यात आले. तसेच सर्व प्रमुखांना सोपविण्यात आलेल्या जबाबदाऱ्या त्यांनी काळजीपूर्वक आणि गांभिर्याने पार पाडाव्यात. जे अधिकारी / कर्मचारी नेमुन दिलेली जवाबदारी पार पाडण्यात टाळाटाळ करतील त्यांचे विरुध्द लोकप्रतीनिधीत्व अधिनियम 1951 चे कलम 134 अन्वये कारवाई प्रस्तावित करण्यात येणार असल्याचे ही उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे यांनी सांगितले. तसेच प्रशिक्षणार्थी अधिकारी / कर्मचारी यांना उपविभागीय अधिकारी दत्तु शेवाळे, तहसिलदार डॉ. संदीप राजपुरे, नायब तहसिलदार गणेश चव्हाण यांनी मार्गदर्शन केले यावेळी बैठकीस तहसिलदार डॉ. संदीप राजपुरे आणि सर्व नोडल अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते......

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या