🌟वाशिम येथे 'वाशिम ग्रंथोत्सव 2023' सोहळ्याचे आयोजन....!


🌟ग्रंथोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमातून  वाचन संस्कृतीचा जागर🌟

फुलचंद भगत

वाशिम:-महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभाग व ग्रंथालय संचालनालय मुंबई व ग्रंथालय अधिकारी कार्यालय वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने वाशिम ग्रंथोत्सव 2023 सोहळ्याचे आयोजन स्थानिक जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयासमोरील पटांगणामध्ये दि. 22 व 23 मार्चला करण्यात आले होते. या कार्यक्रमात अनिल बळी दिग्दर्शित सांस्कृतिक कार्यक्रमातून वाचन संस्कृतिचा जागर करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ साहित्यिक बाबाराव मुसळे हे होते. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून जिल्हाधिकारी बुवनेश्वरी होत्या यावेळी 'वाचन संस्कृती मध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे योगदान' या  विषयावर अनिल बळी,  पी.एस.खंदारे व इतर कलावंतांनी तुफान विनोदी व राष्ट्रीय एकात्मता, वाचन संस्कृतीवर आधारित मनोरंजनात्मक संगीतमय कार्यक्रमाने तर प्रेक्षकांची सतत तीन तास दाद मिळवली.


    या मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे सूत्रधार म्हणून शाहीर अनिल बळी व प्रा.सौ.सविता अनिल बळी यांनी तर गाडगे बाबाच्या भूमिकेत पी.एस.खंदारे यांनी उत्कृष्ट समाज प्रबोधन केले. त्यांना साथ दिली संगीतमय संचामधील गायक भास्कर गायकवाड, गायिका वंदना गायकवाड, ढोलकी वादक सुनील सावळे, हार्मोनियम वादक दाजीबा गायकवाड, शिवाजी गायकवाड, खंजिरी वादक, यासह किसन खडसे, नागरदास, मधुकर ताजने, दुबळवेल, रामेश्वर लबडे, उमरदरी, शामराव राठोड, यांनी प्रत्यक्ष सहभाग घेऊन भारुड, जागर, नाटिका, दारूबंदी, वाचन संस्कृती, भ्रष्टाचार निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन, साक्षरता अभियान, कुटुंब नियोजन, पाणी आडवा पाणी जिरवा, स्वच्छ भारत, इत्यादी ज्वलंत समस्या वर अनिल बळी पी.एस.खंदारे यांनी कला सादर केली. असून उत्कृष्ट अभिनय व सादरीकरणाबद्दल ग्रंथोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष सहाय्यक ग्रंथालय संचालक राजेश पाटील, जिल्हा ग्रंथालय अधिकारी बालाजी कातकडे, पत्रकार प्रा. गजानन वाघ, शिक्षणाधिकारी राजेश शिंदे, जिल्हा ग्रंथालय संघाचे प्रभाकर घुगे, जिल्हा ग्रंथालयाचे नवलकुमार कवळे, गं.भी.बेदरे, इत्यादी मान्यवरांनी सांस्कृतिक संच कलावंतांचा पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन यथोचित सत्कार केला.

      प्रस्तुत वाचन संस्कृतीवर आधारित जनजागृती सांस्कृतिक कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विलास कांबळे, सिताराम नालेगावकर, समाधान अवचार, बळीराम नरवाडे रिसोड, प्रा.ताटके कारंजा, गुणरत्न पखाले मालेगाव, गोविंद राठोड मांनोरा, सुभाष हातोलकर, रामभाऊ टेमधरे आदींनी परिश्रम घेतले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या