🌟वा रे वा नियतीचा खेळ 2019 च्या निवडणुकीत पराभव केलेल्या उमेदवाराचाच प्रचार करण्याची आली वेळ......!


🌟मा.मुख्यमंत्री खा.अशोक चव्हाण यांना 2024 च्या निवडणुकीत करावा लागणार खा.चिखलीकर यांचा प्रचार🌟             

✍🏻वृत्त विशेष : सखाराम कुलकर्णी - नांदेड 

नांदेड - नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या 2019 च्या निवडणुकीत प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे विरुद्ध अशोकराव चव्हाण निवडणुकीच्या रिंगणात होते. दोघात अटीतटीचा सामना होऊन मातब्बर असलेले अशोकरांचा पराभव प्रतापरावांनी करून वेगळा इतिहास निर्माण केला होता. तर आता दुसऱ्याच वेळेस 2024 च्या लोकसभा निवडणुकीत अशोक रावांना पराभव केलेल्या प्रतापरावांचा प्रचार करण्याची वेळ आली आहे. यावरून हे दिसते की वारे वा नियतीचा खेळ लोकसभेच्या निवडणुकीच्या तारखा  लवकरच जाहीर होत असून काही पक्षांनी आपल्या उमेदवारांची  यादी जाहीर केली. त्यात भाजपानेही महाराष्ट्रातील काही उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर केली. त्यात नांदेडला विद्यमान  खासदार असलेले  प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे नाव जाहीर झाले. अशोकराव चव्हाण नुकतेच काँग्रेस मधून भाजपमध्ये आले व त्यांना राज्यसभेची खासदारकी बहाल करण्यात आली .या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अशोकरावांनी  आपले मेहुणे भास्करराव पाटील खतगावकर यांची सून डॉ. मीनल खतगावकर यांच्या उमेदवारीसाठी खूप प्रयत्न केले व  विद्यमान खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे प्रयत्न. यामुळे नांदेडकरांमध्ये संभ्रम झाला होता की प्रतापरावांचे वर्चस्व राहणार की अशोकराव चव्हाण यांचे वर्चस्व वाढणार अशी चर्चा होत असताना अशोकरावला उमेदवार मागणीचा पराभव पत्करावा लागला व प्रतापराव पाटील चिखलीकर यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी जाहीर केली. यामुळे या निवडणुकीत  भारतीय जनता पक्षातच प्रचाराची वेगळीच रणधुमाळी माजणार .कारण अशोकराव चव्हाण यांना 2019 मध्ये पराभवाची धूळ चारणाऱ्या प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा यावेळेस  अशोकरावांना जोमाने प्रचार  करावा लागणार व अशोकराव बरोबर आलेल्या बऱ्याच काँग्रेस नेत्यांना प्रतापरावांचा पराभव प्रचार करावा लागणार. 2019 पासून आतापर्यंत अशोकराव व  प्रतापराव यांच्यात राजकीय वैर विस्तवासारखे होते.बरेच  वर्षापासून  दोघात  राजकीय  वैर आहे. एकमेकांना अपमानास्पद बोलण्याची संधी सोडत नव्हते. नुकतेच एका मुलाखतीत प्रतापराव यांनी अशोकरावांच्या भाजपाच्या प्रवेशाबद्दल वक्तव्य केले होते की अशोकराव भाजपामध्ये प्रवेश करण्या अगोदर जेलमध्ये असतील .हे असे गंभीर वक्तव्य प्रतापरावांनी केले होते व अशोकराव अशी वक्तव्य विसरत नाहीत हे तितकेच खरे. आता मात्र भाजपच्या पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार अशोकरावांना प्रचारानिमित्त चिखलीकरांचे उंबरठ्यावर जाणे भाग पडत आहे. व त्यांचा प्रचार जोमाने करून त्यांना निवडून आणणे त्यांचे कर्तव्य ठरणार आहे .यदाकदाचित  प्रतापराव  यांचा  पराभव  झाला  तर  त्याचे  खापर  अशोकरावांवर फूटेल. तरीपण अशोकराव राजकीय कट्टर  द्वेषी असलेले प्रतापरावांचा प्रचार कसा करतील याकडे नांदेड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे .शेवटी वारे वा नियतीचा खेळ असेच म्हणायची वेळ या प्रचार रणधुमाळीमुळे आली आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या