🌟वर्ग-2 च्या जमिनीचे रुपातंर भोगवटादारे वर्ग-1 मध्ये 7 मार्चपर्यंत करा....!


 🌟एकही प्रकरण प्रलंबित राहणार नाही याचीही दक्षता घेण्याचे निर्देश तहसिलदार परभणी यांनी संबंधितांना दिले 🌟

परभणी (दि.04 मार्च) :  महाराष्ट्र जमीन महसूल नियम, 2019 च्या अधिसूचनेतील तरतुदीनुसार भोगवटादार वर्ग-2 च्या जमिनीचा धारणाधिकार भोगवटादार वर्ग-1 मध्ये सवलतीच्या दराने रुपांतरीत करण्याचा कालावधी हा अधिसूचनेच्या दिनांकापासून 3 वर्षांपर्यंत होता. हा कालावधीत दि. 27 मार्च, 2023 च्या अधिसूचनेनुसार सवलतीच्या दराने धारणाधिकार वर्ग-1 मध्ये रुपांतरीत करण्यासाठी 5 वर्ष करण्यात आला आहे.  

दि. 27 मार्च, 2023 रोजीच्या अधिसूचनेतील तरतुदीनुसार सवलतीच्या दराने भोगवटादार वर्ग-2 च्या जमिनीचे रुपांतर भोगवटादार वर्ग-1 मध्ये करण्याबाबतचा कालावधी हा दि. 7 मार्च, 2024 रोजी संपुष्टात येत असून यासंदर्भात प्राप्त झालेल्या अर्जापैकी कोणा अर्जदारास / संस्थेस अधिमूल्याची रक्कम भरण्याच्या सूचना दिल्या असल्यास, अधिमूल्याची रक्कम चलनाने दि. 7 मार्च, 2024 पूर्वी भरण्यात यावी. जे अर्जदार / संस्था दिलेल्या मुदतीत अधिमूल्याची रक्कम भरणा करतील त्यांनाच या सवलत योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील. मुदतीनंतर अधिमूल्याची रक्कम भरल्यास सवलतीच्या दराचा लाभ मिळणार नाही.

भोगवटादार वर्ग-2 चा धारणाधिकार वर्ग-1 मध्ये रुपांतरीत करणे संदर्भात अर्जदारांची कागदपत्रांच्या अभावी अपूर्ण प्रकरणांत शासनाची जबाबदारी राहणार नाही. तसेच परिपूर्ण एकही प्रकरण प्रलंबित राहणार नाही याचीही दक्षता घेण्याचे निर्देश तहसिलदार परभणी यांनी संबंधितांना दिले आहेत.....

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या