🌟बायोगँस प्लॅन्टसाठी अर्थसहाय्य पुरवठा योजनेअंतर्गत : प्रस्ताव 15 मार्चपर्यंत सादर करा.....!


🌟योजना गावपातळीवर राबविण्यासाठी गट विकास अधिकारी पंचायत समितीमार्फत अर्ज स्विकारण्यात येणार🌟

परभणी : जिल्हा समाजकल्याण विभाग, जिल्हा परिषदेमार्फत जिल्हा परिषदेच्या उत्पन्नाच्या 20 टक्के रक्कमेतून मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी वैयक्तीक लाभाच्या योजनेमधून मागासवर्गीयांना बायोगँस प्लॅन्टसाठी अर्थसहाय्य पुरवठा करण्यात येणार आहे. ही योजना  गावपातळीवर राबविण्यासाठी गट विकास अधिकारी पंचायत समितीमार्फत अर्ज स्विकारण्यात येणार आहेत

योजनेच्या अटी व शर्ती खालील प्रमाणे आहेत. अर्जदार ग्रामीण भागातील रहिवाशी असणे बंधनकारक आहे. त्यांचे वय 16 ते 60 वर्षे असावे. अर्जदाराने विहित नमुन्यात अर्ज संबंधीत गट विकास अधिकारी पंचायत समिती यांचेकडे सादर करावा. अर्जदार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, व नवबौध्द, विमुक्त जाती भटक्या जमाती या प्रवर्गातील असावा. दिव्यांग लाभधारक असेल तर त्याने दिव्यांगाचे प्रमाणपत्र ऑनलाईन असणे आवश्यक आहे. प्रमाणपत्राची छायंकित सत्यप्रत जोडावी. सक्षम प्राधिका-यांने दिलेले जात प्रमाणपत्राची छायांकित सत्यप्रत जोडावी. सक्षम प्राधिकाऱ्यांने दिलेले रहिवाशी प्रमाणपत्र जोडावे.

सन 2023-24 ह्या वर्षातील एक लाखापर्यंतचे वार्षिक उत्पन्न सक्षम प्राधिका-यांने दिलेले प्रमाणपत्र जोडावे. अर्जासोबत आधारकार्ड, व आधारकार्ड लिंक बँकेचे पासबुकाची छायंकित प्रत जोडावी. अर्जदाराच्या मालकीची स्वतःची शेत जमीन आहे का? होय/नाही असल्यास तपशिल (सातबारा उतारा जोडावा. बायोगँस सयंत्र बांधण्यासाठी स्वत:ची जागा आहे, याबाबत नमुना नंबर ८ चा ग्रामपंचायतचा उतारा जोडावा. वरील अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या इच्छुक अर्जदाराने विहित नमुन्यात अर्ज संबंधीत गट विकास अधिकारी पंचायत समिती येथे अर्ज दि. 15 मार्चपर्यंत सादर करण्याचे आवाहन जिल्हा समाजकल्याण अधिकारी, परभणी यांनी केले आहे......

******

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या