🌟राष्ट्रीय समाज पक्षाचा 11 मार्चला लोकसभा विजय निर्धार मेळावा....!


🌟राज्याचे माजी मंत्री तथा रासप नेते महादेव जानकर यांची उपस्थिती🌟

परभणी (दि.०६ मार्च) : राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री महादेव जानकर हे परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणुक लढवणार आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने 11 मार्च रोजी परभणीत लोकसभा विजय निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

          11 मार्च रोजी सकाळी 10 वाजता नृसिंह पोखर्णी येथून श्री नृसिंहाचे दर्शन घेऊन जानकर यांच्या नेतृत्वात भव्य रॅली काढण्यात येणार आहे. ही रॅली नृसिंह पोखर्णी येथून गंगाखेड-परभणी या महामार्गाने परभणी शहरात दाखल होईल. या रॅलीतून जानकर यांच्या नेतृत्वात जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे. ही रॅली उड्डाण पुलावरुन बसस्थानक मार्गे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतीबा फुले, वसंतराव नाईक या महामानवास अभिवादन करुन वसमत रोडमार्गे श्रीकृष्ण गार्डन मंगल कार्यालय, वसमत रोड परभणी येथे दुपारी 1 वाजता जाहीर सभा होणार आहे. या सभेस महादेव जानकर हे मार्गदर्शन करणार आहेत.

या कार्यक्रमास गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार  रत्नाकर गुट्टे, राज्याचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, राज्य महासचिव ज्ञानेश्‍वर सलगर यांची उपस्थिती राहणार आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या